ऋतिका वर्पे हीच्या ऑपरेशनसाठी शिवसेना नगरसेवक आले धावून..माजी शहरप्रमुख संभाजी कदम व नगरसेवक दत्ता कावरे यांच्या पुढाकारातून दोन लाखांची मदत


ऋतिका वर्पे हीच्या ऑपरेशनसाठी शिवसेना नगरसेवक आले धावून..माजी शहरप्रमुख संभाजी कदम व नगरसेवक दत्ता कावरे यांच्या पुढाकारातून दोन लाखांची मदत

कु.ऋतिका वर्पे हीच्यावरील शस्त्रक्रियेसाठीचा मदतीचा धनादेश सुपूर्द करतांना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे. (छाया : राजु खरपुडे)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - हालाखाची परिस्थिती आणि त्यात मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा मोठा खर्च. अशा मोठ्या अडचणीत सापडलेल्या वर्पे परिवाराच्या मदतीला शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम,  नगरसेवक दत्ता कावरे, माजी नगरसेवक आसाराम कावरे हे धावून आले आणि पाहता पाहता दोन लाखांची मदत वर्पे परिवाराला मिळवून दिली.

माळीवाडा येथील रहिवासी ऋतिका उत्तम वर्पे हीस डोके दुखीच्या त्रासामुळे  दवाखान्यात अ‍ॅडमिट केले असता मेंदूवर शास्त्रक्रिया करणे आवश्यक होते. वर्पे परिवाराने मोठ्या कष्टाने पैसांची जमवा जमव करुन  मेंदूचे एक ऑपरेशन केले परंतु दुसर्‍या ऑपरेशन करणे आवश्यक असल्याने त्यासाठी मोठा खर्च डॉक्टरांनी सांगितला. वर्पे परिवाराची परस्थिती जेमतेम असल्याने दुसर्‍या ऑपरेशनसाठी पैसे जमविणे अवघड झाले होते. ही गोष्ट शिवसेनेचे माजी शहरप्रमुख  संभाजी कदम व दत्ता कावरे यांना समाजल्यानंतर त्यांनी वर्पे कुटूंबियांची भेट घेऊन धीर दिला पैशांची व्यवस्था करण्याचे आवश्‍वासन दिले. याबाबत एकत्रित चर्चा करुन याबाबत संबंधितांना माहिती  दिली. यानंतर शिवसेना नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे करत सुमारे 2 लाख 8 हजार रुपये जमा करत हा मदतीचा धनादेश वर्पे परिवाराकडे सुपूर्द केला. याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेकांचे काम-धंदे बंद आहे. अशा परिस्थिती घरखर्च भागवणेही मुश्किल असतांना, वर्पे कुटूंबियांवर अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे दु:खाचा डोंगरचा कोसळला ही माहिती समजल्यावर आम्ही  वर्पे कुटूंबियांना धीर देत कु.ऋतिका हीच्या ऑपरेशनसाठी मदत जमा केली. जमा झालेल्या मदतीतून तीचे ऑपरेशन यशस्वी होईल. ती चांगली  बरी होईल. त्याचप्रमाणे यापुढेही या कुटूंबियांच्या पाठिशी आम्ही उभे राहू, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी दत्ता कावरे म्हणाले, संकटात मदत करणे हे आपले आद्य कर्तव्या आहे. ही भावना मनात ठेवून वर्पे कुटूंबियांना मदत केली आहे. कोणत्याही चांगल्या कामांना अनेकांची हातभार लागत असतो, त्याची प्रचित यानिमित्त आली. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी झालेली आहे. कु. ऋतिका हीचे ऑपरेशन होऊन ती पूर्वीप्रमाणेच आनंद राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या मदतीबद्दल वर्पे कुटूंबियांनी संभाजी कदम, दत्ता कावरे, आसाराम कावरे आदिंसह सर्वांचे आभार मानले. जाहिरात
Search
विडिओ
Recent News