इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वोतोपरी मदत - अनिकेत भरणे


इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णासाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने सर्वोतोपरी मदत - अनिकेत भरणे

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड 

इंदापूर तालुक्यातील भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना रुग्णाना ऑक्सिजन बेड, रेडमीसिवीरची उपलब्धता आणि प्लाझ्मा देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील असल्याचे भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक अनिकेत भरणे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य चांगले रहावे. या कोरोना सारख्या महामारीच्या कालावधीत आजारापासुन मुक्तता मिळण्यासाठी तालुक्यात १२०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यविभागातील कर्मचारी याच्यावर ताण आला आहे. अशा परीस्थितीत कोरोना रुग्णाना  ऑक्सिजन बेड,रुग्णवाहिका आणि रेमडेसीवीर इंजेक्षन तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शना खाली  भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व कार्यकर्ते अनिकेत भरणे,श्रीराज भरणे, निलेश धापटे,दिपज गलांडे,भूषण सुर्वे ,निलेश बंडगत ,राहुल येडे आदी रात्रदिवस काम करीत आहेत. तसेच तालुक्यातील गरजुना याचा लाभ मिळावा म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 

भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुणे येथील अक्षय ब्लड बॅक, इंदापूर तालुक्यातील मुक्ताई ब्लड बॅक,पंढरपूर येथील ब्लड बॅकेत जावुन प्रतिदिन  १०-१२ कार्यकर्ते प्लाझ्मा दान करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने अनिकेत भरणे यांनी आतापर्यंत चार वेळा प्लाझ्मा दान केला आहे. यापुढेही आपण कोरोना रुग्णाकरीता प्लाझ्मा दान करणार असल्याचे यावेळी भरणे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News