कर्जत जामखेड मतदार संघातून आ. रोहित पवारांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कुकडी सल्लागार समितीवर कर्जतच्या प्रतिनिधी ऐवजी श्रीगोंद्यातील सदस्याची नियुक्ती


कर्जत जामखेड मतदार संघातून आ. रोहित पवारांच्या वतीने देण्यात येणाऱ्या कुकडी सल्लागार समितीवर कर्जतच्या प्रतिनिधी ऐवजी श्रीगोंद्यातील सदस्याची नियुक्ती

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे: कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ कारभारामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षापासून कुकडीच्या पाण्याचा खेळखंडोबा झाला असून कर्जत तालुक्यासह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे आपल्या हक्काचे व भरवशाचे पाणी न मिळाल्यामुळे या भागातील शेतकरी देशोधडीला लागले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यामुळे  उघडपणे आत्महत्या करण्याची भाषा बोलू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा शेतीला केला जात होता. परंतु आता शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा व पीके जळून जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. आणि त्यामुळे कर्जत तालुक्याची अर्थव्यवस्था कोलमडून शेतकऱ्यांचे भरून न येणारे नुकसान झाले. असा घणाघाती आरोप भाजपाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  केला आहे. या पत्रकातून पोटरे म्हणाले की पुण्यातील नेत्यांनी चालू उन्हाळी हंगामातील आवर्तन कुकडीच्या उपयुक्त साठ्यातून त्यांच्या भागातील शेतीला पाणी घेऊन सर्व बंधारे भरून घेतले. मात्र नगर जिल्ह्यातील तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्याच्या आधीच  प्रशांत औटी नावाच्या कार्यकर्त्या मार्फत न्यायालयात याचिका दाखल करून कर्जत तालुक्याला मिळणारे आपल्या हक्काचे पाणी थांबवले गेले. न्यायालयात याचिका दाखल करणारा हा प्रशांत औटी कोणाचा कार्यकर्ता आहे व त्याच्या पाठीमागे कोण आहे. याचा शोध घेणे गरजेची आहे. असेही पोटरे यांनी पत्रकातून म्हंटले आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने मागच्या वर्षी दिनांक २८ डिसेंबर २०२०  रोजी शासन निर्णयानुसार कुकडी लाभ क्षेत्रातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदार संघातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी बाबतीत प्रश्न सोडवण्यासाठी व आपल्या भागाला यथोचित न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील अभ्यासू शेतकर्‍यांचा कुकडीच्या सल्लागार समितीवर एक अशासकीय सदस्य  प्रतिनिधी म्हणून नावे कळवण्याची सूचना जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आली होती या अनुषंगाने दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी समितीच्या झालेल्या बैठकीत चार विधानसभा सदस्यांनी अश्या चार अशासकीय सदस्यांची नावे प्रतिनिधी म्हणून निवड केली होती. यात प्रामुख्याने दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागापूर, तालुका आंबेगाव येथील देवदत्त जयवंतराव निकम यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे. तसेच आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे, तालुका जुन्नर येथील अशोक विठोबा घोडके यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. तर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोहकडी, तालुका पारनेर येथील सुदाम बबन पवार यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केल्याचे दिसत आहे. म्हणजेच या तीनही लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच मतदारसंघातील अशासकीय सदस्यांच्या नावाची प्रतिनिधी म्हणून शिफारस केलेली आहे. परंतु कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुका किंवा जामखेड तालुक्यातील एकाही कार्यकर्त्यांची निवड केली नसून आमदार पवार यांनी कुकडीच्या सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदा येथील राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांची नियुक्ती करून एक नवलच केले आहे. घनश्याम शेलार यांची कर्जत जामखेड चे प्रतिनिधी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अधीक्षक अभियंता कुकडीचे ह. तु . धुमाळ सिंचन मंडळ यांच्या संयुक्त सहीने घनश्याम शेलार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती सचिन पोटे यांनी दिली.  सचिन पोटरे म्हणाले की कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फौज असताना सुद्धा कर्जत तालुक्यातील एकही पुढारी याबाबत लायकीचा नव्हता का? म्हणून श्रीगोंद्याचा प्रतिनिधी दिला. कर्जत तालुक्यात महा विकास आघाडीतील अनेक मोठमोठे पदाधिकारी व कार्यकर्ते होते यात प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एॅड. कैलास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बळीराम यादव, असे अनेक जण अनेक वर्षापासून आपापल्या पक्षात निष्ठेने काम करणारे पदाधिकारी असून कुकडीच्या पाण्याबाबत यापैकी कोणीही कर्जत तालुक्याची कुकडीच्या आवर्तना बाबत  ठोसपणे बाजू  मांडली असती. परंतु आमदार रोहित पवार यांनी या नेत्यांपैकी एकाचेही नाव कुकडी सल्लागार समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून सुचवले नाही हे विशेष! आता प्रतिनिधी म्हणून नेमणूक केलेले घनश्याम शेलार कुकडी सल्लागार समितीमध्ये कर्जत तालुक्याची रास्त बाजू मांडणार की त्यांच्या श्रीगोंदा तालुक्याची बाजू मांडणार हे येणारा काळच ठरवेल असे पोटरे यांनी म्हटले आहे 

  कुकडीच्या प्रश्नावर व कर्जत तालुक्यातील कुकडी आवर्तनाच्या वेळी येणाऱ्या अडचणीवर घनश्याम शेलार कर्जत तालुक्याची बाजू मांडणार का श्रीगोंदा तालुक्याची बाजू लावून धरणार, तसेच कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीच्या प्रश्नाबाबत घनश्याम शेलार न्याय मिळवून देतील का? हे सर्व प्रश्न आता कर्जत तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहेत. कुकडी सल्लागार समितीवर स्थानिक नेत्यांना डावलून श्रीगोंद्यातील सदस्याची केलेली नियुक्ती कर्जत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य असेल का? असे अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या कर्तृत्वामुळे नेते मंडळींच्या व जनतेच्या मनात उभे राहिले आहेत. परंतु कुकडीच्या कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर होणारा अन्याय आणि कर्जत तालुक्याच्या अस्मितेचा झालेला प्रश्न तसेच सर्वसामान्यांच्या ही लक्षात येण्यासाठी व भविष्यात येणारी संकटे परतवून लावण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायम वचनबद्ध राहील.    - सचिन पोटरे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाजपा

जाहिरात
Search
विडिओ
Recent News