रासायनिक खतांची दरवाढ मागे नं घेतल्यास काळे झेंडे दाखवणार, दत्तात्रय फुंदे


रासायनिक खतांची दरवाढ मागे नं घेतल्यास काळे झेंडे दाखवणार,   दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी, सज्जाद पठाण :

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी घोषणा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्यावेळी केल्याने शेतकऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान केले परंतु आजची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक खताच्या गोणी मागे सातशे ते आठशे रुपये दरवाढ कोणतीही पूर्वसूचना न देता वाढ केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यापेक्षा शेतकरी संपवण्याच्या मार्गावर आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या कोरोणा परिस्थितीमुळे शेतकरी हैराण झालेला आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ चालूच आहे शेतमालाला हमी भाव मिळत नाही त्यातच खरीप हंगामामध्ये खतांचे दर अचानक पणे वाढल्याने शेतकऱ्यांचा पाठीत खंजीर खुपसला आहे

 तातडीने दरवाढ मागे न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी स्वस्त बसणार नाही तर भाजपचे आमदार खासदार यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला जाईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News