कोरोनावर मात करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे कोरोना मदत वाहिनी अभियान प्रशासनाला सहकार्य करुन उत्तम रित्या नियोजन करण्यासाठी पुढाकार


कोरोनावर मात करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे कोरोना मदत वाहिनी अभियान  प्रशासनाला सहकार्य करुन उत्तम रित्या नियोजन करण्यासाठी पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- कोरोना महामारीत एकजुटीने लढा देऊन कोरोनावर मात करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे जाळे पसरवून कोरोना मदत वाहिनी अभियानाचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करुन उत्तम रित्या नियोजन होण्यासाठी स्वयंसेवी संघटना काम करणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

कोरोना महामारीच्या अदृश्य रुपाने तिसरे महायुद्ध जगभरात सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतासह महाराष्ट्रात झपाट्याने वाढला आहे. या कोरोना महामारीत रुग्णांना वेळेवर उपचार व नागरिकांना लस मिळण्यासाठी योग्य नियोजन होणे महत्त्वाचे आहे. शासकीय यंत्रणा कमी पडत असताना स्वयंसेवी संघटनांनी देखील या लढ्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा व लस मिळण्यासाठी स्वयंसेवी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. तसेच कोरोना महामारीत वैद्यकिय उपचाराचे अवाजवी बील, औषधांचा काळाबाजार या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. रमजान ईद व अक्षत तृतीयाच्या मुहुर्तावर हा प्रस्ताव ठेऊन त्याला अनेक स्वयंसेवी संघटनांनी मंजूरी दिली असल्याचे म्हंटले आहे. अहमदनगर जिल्ह्यात स्वयंसेवी संघटनांचे मोठे जाळे आहे. सर्वांना बरोबर घेऊन या महामारीत कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रकारची जबाबदारी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देण्यात येणार आहे. कोरोनाला हरविणे एकट्याचे काम नसून, सर्व समाज स्तरातून या विरोधात जागृतीची आवश्यकता आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येकाने योगदान देऊन आपली भूमिका बजावल्यास कोरोनावर मात करता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. कोरोना मदत वाहिनी अभियानासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, ओम कदम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, फरिदा शेख, पोपट भोसले आदी प्रयत्नशील आहेत.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News