गिरीम येथील कोवीड सेंटर ला आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा. शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांची भेट,दिला मदतीचा हात


गिरीम येथील कोवीड सेंटर ला आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा. शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांची भेट,दिला मदतीचा हात

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: दौंड- कोरोना महामारिने हाहाकार केला असताना,जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जावेत,जनता आज भयभीत झाली आहे,त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे,खाजगी दवाखान्यात होणारे अवाच्यासव्वा बिल,औषध,रक्त,पलाजमा मिळविण्यासाठी नातेवाईकांची धडपड या सर्व बाबींचा विचार करून गिरीम येथील,सरपंच उपसरपंच सर्व सदस्य,तसेच गावातील तरुण,सामाजिक कार्यकर्ते,यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गिरीम गावात कोविड सेंटर सुरू करून गावातील लोकांची गैरसोय थांबवली, गिरीम ता दौंड जि पुणे  येथील कोवीड शेंटरला आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी भेट देऊन सरपंच  नंदकुमार खताळ सदस्य  मनोज जाधव, मिलिंद थोरात युवा नेते अमोल मारकड कोवीड योद्धा  प्रशांत खताळ सामाजिक कार्यकर्ते  पांडूरंग मदणे  झुंबर शिंगटे  रणजित जाधव  किरण खताळ,रोहिदास बनकर, गणेश जाधव,संपत येळे, महेश शिंगटे इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीत सात हजार रुपये धनादेश सरपंच यांना स्वाधीन करण्यात आला दौंड शहरा लगत असणाऱ्या गिरीम गावातील युवकांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे परंतु दौंड तालुक्यातील प्रत्येक गावाने गिरीम गावचा आदर्श घेऊन कोवीड शेंटर सारखे उपक्रम राबविले तर निश्चितच कोरोना सारख्या महाबीमारीला दौंड तालुका सह महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News