गुरू अर्जन देवजी कोविड केअर सेंटर मधील परिचारिकांचा सन्मान


गुरू अर्जन देवजी कोविड केअर सेंटर मधील परिचारिकांचा सन्मान

कोरोनाच्या लढ्यात परिचारिकांचे कर्तव्य, समर्पण व सेवाभाव अतुलनीय - आयुक्त शंकर गोरे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरात महापालिकेच्या सहकार्याने चालविण्यात येणार्‍या हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथील गुरू अर्जन देवजी कोविड केअर सेंटर मध्ये परिचारिका दिनानिमित्त रुग्णांची सेवा करणार्‍या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या संकट काळात आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून सतत कार्यरत असणार्‍या परिचारिकांना मनपा आयुक्त शंकर गोरे व विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राहुल बजाज, सुनील छाजेड, मनोज मदाण, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, राजा नारंग, डॉ सलमान शेख, डॉ. सिमरनकौर वधवा, सिमर वधवा, राजवंशसिंह धुप्पड, विपुल शाह आदी उपस्थित होते.आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, परिचारिका कोरोनाच्या लढ्यात परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभ्या आहेत. त्यांचा कर्तव्य, समर्पण व सेवाभाव अतुलनीय आहे. या संकटकाळात परिचारिका देवदूताची भूमिका बजावत असून, त्यांच्या कार्याला वंदन असल्याचे सांगितले. पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांनी फ्लोरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेने स्वतःचे दुःख विसरून रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालत दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस परिचारिका दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कोविड सेंटरचे योगेश तांबे व सर्व परिचारिकांना फेटे बांधून सन्मान झाला. यावेळी उपस्थित परिचारिकांच्या हस्ते केक कापून व वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील देण्यात आला.


घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरात महापालिकेच्या सहकार्याने चालविण्यात येणार्‍या हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथील गुरू अर्जन देवजी कोविड केअर सेंटर मध्ये परिचारिका दिनानिमित्त रुग्णांची सेवा करणार्‍या परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे व विभागीय पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे समवेत हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, राहुल बजाज, सुनील छाजेड, मनोज मदाण, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, राजा नारंग, डॉ सलमान शेख, डॉ. सिमरनकौर वधवा, सिमर वधवा, राजवंशसिंह धुप्पड, विपुल शाह आदी. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News