केक कापून जागतीक परिचारिका दिन साजरा


केक कापून जागतीक परिचारिका दिन साजरा

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी :

पुणे : प्रभाग क्र. 33 वडगांव धायरी - सनसिटीचे नगरसेवक राजाभाऊ मुरलीधर लायगुडे व यशवंत रामदास लायगुडे यांच्या मार्गदर्शनाने नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे व पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा मोनाली विधाते यांच्या अध्यक्षतेखाली जागतीक परिचारिकता दिन साजरा करण्यात आला. 

      कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या सर्वाचे वेळोवेळी नागरिक शेतकरी संघाच्या वतीने आभार मानले असून आज जागतिक परिचारिकता दिनादिवशी पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड वरील लायगुडे कोवीड सेंटर मधील सर्व परिचारिकांचे आभार मानून व केक कापून परिचारिकता दिन साजरा केला. यावेळी मोनाली विधाते यांनी सर्वाचे आभार मानले.

     जागतीक परिचारिका दिनानिमित्त ओम हॉस्पिटल व लायगुडे कोविड सेंटरचे फार्मासिटीज कल्पेश घोलप, डॉ. अक्षय संतात, डॉ. प्रशात आवळे, प्रमोद गीरी, तानाजी काटेवाड व सर्व परिचारिकांचे कोविड काळात अहोरात्र देश सेवा केल्याबद्दल चंद्रकांत मोरे यांनी आभार मानले.

     यावेळी सविता नेमाडे, अनिता चौघुले (बिरामने), सुषमा शिरसाट, संगीता गवळी, लिना मारून, भाग्यश्री बिरादार, रेखा मिटकरी, वर्षा कोलते, पूजा तांबट, शितल शिंदे, तानाजी काटेवाड, मानसी पंडीत, सोनाली मोटे, रेखा सदिनदे, कावेरी लहाने, गायत्री काळभोर, पृथा ढोले, केतकी देशमाने, सविता कांबळे, स्नेहल वाडकर, रूपाली घाडवे या सर्वाच्या हस्ते केक कापून जागतीक परिचारिकता दिन साजरा करण्यात आला. या वेळी नागरिक शेतकरी संघाचे चंद्रकांत मोरे, मोनाली विधाते, विश्वराज विधाते, मजिता सिंग, सुग्रीव धावारे, राजनंदिनी गव्हाणे, नितीराज कदम, नितीन सुर्वे, दिपक चौघुले आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News