शेवगांव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटने तर्फे कोरोना कोव्हीड च्या रुग्णांना पाणी आणि उकडलेली अंडी


शेवगांव तालुका स्वस्त धान्य दुकानदार  संघटने तर्फे कोरोना कोव्हीड च्या रुग्णांना पाणी आणि उकडलेली अंडी

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण:

कोव्हीड कोरोनाच्या भीषण परिस्थितीत स्वतः कोव्हीड योध्याच्या भुमिकेत असताना आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो या उक्ती प्रमाणे त्रिमूर्ती कोव्हीड सेंटर 300 बॉक्स बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह 100 बॉक्स ग्रामीण रुग्णालय शेवगांव शाखा (PHC 02 ) येथे 100 पाण्याचे बॉक्स सुमारे दोन हजार उकडलेली अंडी असा सुमारे पन्नास हजार रुपये खर्च करून समाजातील दुर्लक्षित घटकापर्यंत मदतीचा हात देणे गरजेचे आहे या वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी शेवगांवचे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.  रामेश्वर काटे नोडल अधिकारी कोव्हीड सेंटर श्रीमती शैलजा राऊळ नायब तहसीलदार श्री मयुर  बेरड 

पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश देशमुख शेवगांव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे श्रीमती मीनाताई कळकुंबे प्रकाश गजभिव प्रवीण नाईक सर्प मित्र श्री भाऊ बैरागी स्वस्त धान्य दुकानदार रामकिसन फुंदे गणेश नवगिरे संकेत काळकुंबे  व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि तालुक्यातील इतर स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते 

ताजा कलम

भविष्यात शेवगांव तालुक्यातील कोरोना कोविड बाधितांसाठी स्वस्त धान्य दुकानदार भरीव मदत करणार आहेत असे सांगितले तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना कॅव्हिडं योद्धे घोषित करून त्यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे असे मीनाताई कळकुंबे यानी सांगीतले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News