जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना शिवीगाळ व धमकी देणार्‍या आ. रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करावी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी


जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना शिवीगाळ व धमकी देणार्‍या आ. रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करावी  महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी

- वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना  शिवीगाळ व धमकी देणार्‍या आ. रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने नगर-नाशिक कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी डि.एम.ढवळे, पी.एस.वाळके, देवीदास ढवळे, गोकूळ शिंदे, अनिल धोत्रे आदि.

 

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत) - वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तेली समाजाचे सुपुत्र डॉ.अजय डवले यांना  शिवीगाळ व धमकी देणार्‍या आमदार रणजीत कांबळे यांना त्वरित अटक करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने नगर-नाशिक कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी डि.एम.ढवळे, पी.एस.वाळके, देवीदास ढवळे, गोकूळ शिंदे, अनिल धोत्रे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च 2020 पासून कोविड-19 महामारी प्रादुर्भाव संपूर्ण जगात सुरु आहे. देशभरातील डॉक्टर्स अहोरात्र सेवा देऊन जनतेची काळजी घेत आहेत. शासकीय आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून वर्धा जिल्ह्यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व तैलिक महासभा युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय डवले यांना अत्यंत शुल्लक कारणावरुन देवळी-पुलगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार रेती माफिया रणजीत कांबळे यांनी खालच्या स्तरावरुन जाऊन घृणास्पद शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याने हा कोरोना योद्धांचा  अपमान असून, त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे हे कृत्य आहे. या घटनेचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व समस्त तेली समाजाच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करुन कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करत आहोत.

यावेळी हरिभाऊ डोळसे म्हणाले, प्रशासकीय व समाज कार्यात योगदान देणारे अधिकार डॉ.अजय डवले यांनी अनेक चांगली कामे केली आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य यंत्रणा रुग्णांना सेवा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आरोग्य सेवेत काम करणार्‍यांवर आज अनेकप्रकाराचे दबाव आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. परंतु आ.रणजीत कांबळे यांनी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता एका जबाबदार अधिकार्‍यांला शिवीगाळ व धमकी देणे म्हणजे आपल्या पदाचा दुरोपयोग करुन दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. त्या विरोधात आम्ही डॉ.अजय डवले यांच्या पाठिशी आहोत. राज्यातील अनेक अधिकारी-कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांनीही या घटनेचा निषेध करुन आ.रणजीत कांबळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचेही श्री.डोळसे यांनी सांगितले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News