लाॅकडाऊन काळात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 134 केसेस ; 1 लाख 29 हजार 300 रु. दंड वसुल : कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई


लाॅकडाऊन काळात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 134 केसेस ; 1 लाख 29 हजार 300 रु. दंड वसुल : कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई

अहमदनगर प्रतिनिधी संजय सावंत:

लाॅकडाऊन काळात शहरातील माळीवाडा, कापडबाजार यासह अन्य ठिकाणी कोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि.12) 134 केसेस करून 1 लाख 29 हजार 300 रुपयांचा दंड वसुलीची कारवाई नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी केली.

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत पो.नि.राकेश मानगांवकर यांच्या सूचनेनुसार स पो नि नितीन रणदिवे. कचरे. पोलीस कर्मचा-यांनी कापडबाजार, माणिकचौक, माळीवाडासह अन्य ठिकाणी विना मास्क असणारे 8 जणांवर केसेस दाखल करून 4 हजार रु दंड वसुल केला.

कोटपा प्रमाणे 5 जणांवर केसेस 1 हजार रुपये दंड, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणा-या 39 जणांविरूद्ध केसेस 17 हजार 400 रुपये दंड तर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणारे 58 जणांवर केसेस दाखल करून 22 हजार 900रुपये दंड वसुली तर आस्थापना चालू ठेवल्यामुळे 23 जणांवर केसेस दाखल करून 83 हजार रु दंड, सोशल डिस्टिंगचे नियम पाळण्यात न आल्याने एक केस करून 1 हजार रुपये दंडासह अन्य अशा 134 केसेस करून 1 लाख 29 हजार 300 रुपयांचा दंड कोतवाली पोलिसांनी वसुल केला आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News