नोंदणी करायची शहरात लस घ्यायला मात्र गावात !! शहरातील नागरिकांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित


नोंदणी करायची शहरात लस घ्यायला मात्र गावात  !!    शहरातील नागरिकांमुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित

गजानन गावडे शिरूर प्रतिनिधी:

मुंबई किंवा मोठ्या शहरांतील नागरिक रजिस्ट्रेशन करून ग्रामीण भागातील केंद्रांवर लसीकरणासाठी येत असल्याने स्थानिकांना लसीकरणापासुन वंचित रहावे लागत आहे.हा अन्याय खपवुन घेतला जाणार नसुन स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य द्यावे अशी तीव्र भावना शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार यांनी व्यक्त केली.

         केंद्र सरकारने लसीकरणासाठी तयार केलेल्या अॅपमध्ये मोठ्या प्रमाणात चुका दिसुन येत असुन त्यामध्ये सुधारणा करणे गरजे आहे.गावाकडील व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये अथवा मोठ्या शहरांमध्ये गेलेले आहे परंतु त्यांचेकडे गावाकडील पत्त्याचे आधार कार्ड आहे अशा नागरिकांच्या लसीकरणास विरोध नाही.मात्र आधार कार्ड मुंबई किंवा मोठ्या शहरातील नागरिक आॅनलाईन व माहिती असल्याने रजिस्ट्रेशन करतात आणि लसीकरणासाठी ग्रामीण भागात येतात.ग्रामीण भागातील अनेक नागरिक अशिक्षित असुन त्यांना आॅनलाईन अॅप वापरता येत नसल्याने व माहिती नसल्यामुळे स्थानिकांना लसीकरणापासुन वंचित रहावे लागत असल्याने त्यांचेवर अन्याय होत आहे.सध्या लसीकरण कमी प्रमाणात होत असुन अशा परिस्थितीत केंद्र सरकारने राज्य सरकारला एक वेगळे अॅप देवुन तालुकानिहाय कोड दिले पाहिजे तसेच स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य दिल्यास त्यांना न्याय मिळु शकतो या भुमिकेतुन याबाबत राज्य सरकार तसेच पालकमंत्री अजित पवार यांना विनंती करून मागणी केली असल्याचे यावेळी बोलताना शिरूर हवेलीचे आमदार अॅड.अशोक पवार म्हणाले.




चाैकट

शिरूर शहरातील लसीकरण केंद्रावर १९ मार्चपासुन आत्तापर्यंत नऊ हजार नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.परंतु, जेव्हापासून ऑनलाईन बुकिंग करून लसीकरण सुरू झाले.तेव्हापासून मुंबई,पुणे यांसह इतर मोठ्या शहरांतील नागरिक शिरूर येथे येऊन लस घेत आहेत.ऑनलाईन बुकिंगव्दारे लसीकरण केंद्रावर बुकिंग घेऊन त्यांना लस मिळते.परंतु, शहरातील लसींचा मर्यादित साठा, अपुरा पुरवठा विचारात घेता शहरातील लसीकरणावर ताण वाढू लागला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी शिरूर शहरातील स्थानिक नागरिकांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News