चंद्रकांत मोरे यांची कोरोनामुळे मरण पावलेल्यांना होतेय मदत


चंद्रकांत मोरे यांची कोरोनामुळे मरण पावलेल्यांना होतेय मदत

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील मानवातील देवदूत चंद्रकांत मोरे यांनी नागरिक शेतकरी संघाच्या माध्यमातून पुणे महापालिका हद्दीतील कोरोना आजाराने घरी क्वारंटाईन असताना मुत्यू पावलेल्या व्यक्तींना घरी जाऊन तो मुतदेह शासनाच्या नियमा प्रमाणे पॅक करून अँबुलन्समध्ये देण्याचे काम सुरू केले आहे.

     नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे हे पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कंदुल यांच्या मार्गदर्शनाने ज्या ठिकाणी कोविड आजाराने घरी मुत्यू झालेले आहेत त्या व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन तो मुतदेह शासनाच्या नियमाप्रमाणे पॅक करून पुणे महापालिकेच्या अँबूलन्स मध्ये देण्याचे सामाजिक कार्य करत आहेत. अशा भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा चंद्रकांत मोरे व त्यांची टीम विनामूल्य सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घेत आहेत. 

      पुणे महापालिका प्रशासनाला व नागरी बांधवांना मदत करणारे चंद्रकांत मोरे यांनी गेल्या दहा वर्षांत ४४२ अपघातग्रस्त मृतदेह उचलण्याकरता पोलीस दलास मदत केली आहे. अपघातग्रस्त ३३ व्यक्तींचे प्राण वाचवण्याकरता मदत केली आहे. अशा देव रूपी माणसाने कोल्हापूर, सांगली, सातारा महापुरा वेळी धर्मादाय कार्यालयाच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य केले आहे. मार्च 2020 पासुन ४०३५ कोरोना रूग्णांना हॉस्पिटलमध्ये शासनाच्या माध्यमातून अॅडमिट करून मोफत उपचार मिळवून देण्याकरता मदत केली आहे.

     या सामाजिक कार्याला चंद्रकांत मोरे यांना देवदूत दिपक चौघुले,  नितीन कदम, पप्पु शेडगे, नितीन सुर्वे,  राजनंदिनी गव्हाणे, कोमल सांवत, वैष्णवी वंडकर, मोनाली विधाते, विश्वराज विधाते, सुग्रीव धावारे, मजिता सिंग, केशव शेटे, कृतिका जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. चंद्रकांत मोरे व त्यांच्या टीमचे पुणे शहरातील नागरिकांच्या वतीने कौतुक केले जात आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News