दैनिक लोकमंथन चे पत्रकार बालकृणाल अहिरे यांना शकील सय्यद ,सद्दाम सय्यद व इतरांनी केली बेदम मारहाण...


दैनिक लोकमंथन चे पत्रकार बालकृणाल अहिरे यांना शकील सय्यद ,सद्दाम सय्यद व इतरांनी केली बेदम मारहाण...

अहमदनगर -(प्रतिनिधी संजय सावंत) नगर येथील दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक बालकृणाल अहिरे हे दुपारी सहकारी मित्रासह मोटारसायकल वरुन घरी जात असतांना त्यांना माळीवाडा बसस्थानकासमोर कट मारुन आरोपी क्रमांक 1)सय्यद शकील हमीद आरोपी क्रमांक 2)सद्दाम शकील सय्यद व अनोळखी 3 ते 4 जणांनी अडवून बेदम मारहाण केली म्हणुन पत्रकार बालकृणाल अहिरे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2021 नुसार आरोपी सय्यद शकील हमीद व सद्दाम शकील सय्यद व 3 ते 4 अनोळखी यांच्या विरुद्ध भांदवी कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 188, 269, सह पत्रकार संरक्षण कायदा 2017 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचेे पोलीसनिरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पो हे काॅ सोनवणे व सुजय हिवाळे यांनी काही तासात दोन आरोपींना पकडुन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. .या गुन्ह्याचा तपास सपोनि.हेमंत भंगाळे पोहेकाँ पठाण हे करीत आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News