सिंघम पोलीस अधिकारी श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक यांचा दौंड पोलीस स्टेशन येथील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून अवैध धंदा करणाऱ्या धंदे वाल्यांच्या मुसक्या आवळल्या


सिंघम पोलीस अधिकारी श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक यांचा दौंड पोलीस स्टेशन येथील परिविक्षाधीन कालावधी पूर्ण दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळून अवैध धंदा करणाऱ्या धंदे वाल्यांच्या मुसक्या आवळल्या

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड शहर आणि परिसरात अवैध धंदेवल्यांचा कर्दनकाळ ठरलेले सिंघम पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांचा दौंड पोलीस स्टेशन मध्ये दबंग दरारा,दिनांक 28/3/2021रोजी पासून श्री मयूर भुजबळ यांनी दौंड पोलिस स्टेशनचा चार्ज आपल्या हाती घेतल्यानंतर एक पथक तयार करून हद्दीतील अवैद्य धंदा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सत्र बेधडक चालू ठेवले, दिनांक 11/5/2021 रोजी त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. सदर कालावधी मध्ये त्यांनी हद्दीतील अवैद्य रित्या वाळू उपसा  करणाऱ्यांवर 15 गुन्हे दाखल करून 40 इसमा विरुद्ध  मोठी कारवाई केली कारवाई मध्ये त्यांनी 26 अवैध वाळू उपसा करणाऱ्या  यांत्रिक फायबर बोटी व 8 वाहने पकडून त्यांनी तब्बल 4 कोटी 39 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला . यांत्रिक फायबर बोटी नदीपात्रात फोडून बुडवून नष्ट करून 8 वाहनांवर महसूल कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली.

त्याचप्रमाणे दौंड शहरातील अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करून तब्बल 7 लाख 30 हजार रुपये चा गुटका व विदेशी सिगरेट जप्त केल्या.

शहरातील तीन जुगार अड्ड्यावर छापा घालून 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

यामध्ये पत्त्याचे क्लब, ऑनलाइन बिंगो मटका, कल्याण मटका अशा अड्ड्यावर छापा घालून दीड लाख रुपये किमतीचा माल जप्त केला. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील देशी विदेशी व हात भट्टी दारू विकणाऱ्या वर कारवाई करत 11 अड्ड्यावर छापा घातला यात दोन मोठ्या गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या भट्या फोडून नष्ट करण्यात आल्या 11  इसमान वर गुन्हे दाखल करून 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. वरील प्रमाणे अशा एकूण 31 मोठ्या कारवाई करून तब्बल 4 कोटी 51 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला    अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत असताना कोरणा विषाणूचा विविध भागांमध्ये वाढता संसर्ग पाहता दौंड शहरामध्ये कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून विना मास्क 1536 केसेस करुन 3 लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच दौंड शहरातील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी पुणे यांचा आदेश होऊनही काही अस्थापना बंद न केल्यामुळे सदर आस्थापनांवर कारवाई करून दंड वसूल केला तसेच दौंड शहरातील दिलेल्या मुदतीत व्यतिरिक्त आस्थापना चालू ठेवून आदेशाची भंग करणाऱ्यांविरुद्ध तहसीलदार दौंड यांचे व नगरपरिषद यांच्यामार्फतिने एकूण 7 आस्थापना सील करण्यात केल्या. कोरोना काळात आरोग्याच्या समस्या व उपास मारी ची वेळ येऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिकास पोलिसांची मदत हा अभिनव उपक्रम सुरू केला* कोरोना लॉक डाऊन काळात दौंड शहरातील निराधार व ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना अन्नधान्याचे किट व सॅनिटायझर मास्क चे वाटप साहेबांनी केले तसेच दौंड शहरात मुस्लिम जनसमुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम धर्मातील पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू असून व सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व लॉक डाऊन पाहता सदर मुस्लिम बांधवांची जागोजागी जाऊन त्यांची विचारपूस करून सदर काळात त्यांना शासकीय नियमांचे पालन करून सण कसा साजरा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

   तसेच covid-19 रोगाची चेन कशी थांबवता येईल या दृष्टीने त्यांनी स्वतः दौंड शहरात येणाऱ्या महत्वाचे रोड या ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार तसेच होमगार्ड यांच्या मदतीने बॅरिकॅडींग करून फिक्स पॉईंट नाकाबंदी नेमून विनाकारण फिरणाऱ्या इसमान वर दंडात्मक कारवाई केली सदरचे काम करत  असताना पोलिस स्टेशनचे काही अधिकारी व अंमलदार हे कोरोना बाधित झाले त्यावेळी त्यांनी स्वतः  कुटुंब प्रमुख या नात्याने  जातीने लक्ष देऊन आजारी पडलेल्या अंमलदार यांना योग्य त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्यांची रोजच्यारोज विचारपूस केले व डॉक्टरांना  योग्य तो उपचार करण्याबाबत सूचना दिल्या. त्यावेळी कोरणा बाधित अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबीयांना स्वतः जाऊन भेटून वेळोवेळी त्यांचे कोरणा रोगावर मात करण्या साठी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला.

   आपल्या दोन महिन्याच्या कालावधीत श्री मयुर भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था लॉक डाऊन परिस्थिती अतिशय चांगल्या तऱ्हेने सांभाळून अवैध धंदा करणाऱ्या ल धंदेवाल्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. शहरातील व ग्रामीण भागातील लोकांनी  श्री मयूर भुजबळ यांचे  कौतुक करून सन्मान केला यापुढेही अशाच कामाची अपेक्षा व्यक्त केली. सदर कालावधी मध्ये त्यांना वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिनव देशमुख हे मार्गदर्शन करीत होते अशा दबंग पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांना महाराष्ट्र भुमी मराठी न्यूज चॅनल कडून पुढील कार्यास शुभेच्छा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News