डायबिटीस इन्शुलिन इंजेक्शनबाबत अफवा पसरवणाऱ्यांना थांबवा - युनायटेड डायबिटीस फोरम


डायबिटीस इन्शुलिन इंजेक्शनबाबत अफवा पसरवणाऱ्यांना थांबवा - युनायटेड डायबिटीस फोरम

सोशल मिडीयावर डायबिटीस इन्शुलिन इंजेक्शनबाबत अफवाचुकीची माहिती पसरविणाऱ्यांना सरकार  आरोग्य मंत्रालयाने थोपवावे - युनायटेड डायबिटीस फोरम

मुंबई : सध्याच्या काळात लोकांमध्ये डायबिटीस (मधुमेहहा आजार बळावू लागला आहेहाच आजार पुढे अनेक विकारांचे कारण बनतोडायबिटीस दोन प्रकारचा असतोएक म्हणजे टाईप-1, जो किमान 5 टक्के रुग्णांमध्येच असतोबहुतांश तो लहान मुलांमध्येच आढळतोत्यावर नियमित इन्शुलिन इंजेक्शन घेणे हाच एकमेव इलाज आहेदुसरा प्रकार टाईप-2, हा उर्वरीत 95 टक्के लोकांमध्ये असतोऔषधे आणि योग्य आहार यामुळे यावर नियंत्रण आणता येतेयातल्या बहुतेकांनाही 10 किंवा 15 वर्षांनी इन्शुलिन इंजेक्शनची गरज लागतेचटाईप-1 या मुलांमधील डायबिटीसवर इन्शुलिन इंजेक्शनचा इलाज बहुतांश देशांत सारखाच आहेपण सोशल मिडीयावर काही लोक अफवा पसरवत आहेत कीत्यांच्या गोळ्यायोगा आणि ध्यानधारणा या इलाजाने तो बरा होऊ शकतोया लोकांचे ऐकून मुलांना इन्शुलिन इंजेक्शन दिले नाही किंवा ते देणे बंद केले तर या मुलांच्या जिवावर बेतू शकतेम्हणून "युनायटेड डायबिटीस फोरमचे अध्यक्ष डॉमनोज चावलासेक्रेटरी डॉराजीव कोविल  ट्रेजरर डॉतेजस शाह यांनी आरोग्य मंत्रालयभारत सरकार आणि अन्य संस्थांना पत्र लिहून आग्रह केला आहे कीही अफवा पसरविणऱ्या लोकांना थोपवा.

        "युनायटेड डायबिटीस फोरम" चे अध्यक्ष डॉमनोज चावला म्हणतातइन्शुलिन हे पाचक ग्रंथींपासून (पेंक्रियाबनवले जातेशरीरातील कार्बोहाइड्रेट एनर्जीमध्ये परावर्तित करण्याचे काम इन्शुलिन करतेपेंक्रियामध्ये इन्शुलिन बनणे बंद होतेग्लुकोज एनर्जीमध्ये परिवर्तित होऊ शकत नाहीतेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन डायबिटीसच्या आजाराचे रूप घेतेटाईप- डायबिटीसवर केवळ इन्शुलिन इंजेक्शन हाच उपचार आहेकाही लोकांनी या अफवा पसरविल्यामुळे किंवा या लोकांचे ऐकून इन्शुलिन इंजेक्शन बंद केले तर लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतोम्हणूनच अफवा पसरविणारांना रोखण्याचे आवाहन सरकार आणि आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवून करण्यात आले आहेअसेही त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News