आता तुम्हीच सांगा... कुटुंबाचे पालन पोषण करायचे तरी कसे ? लाॅकडाऊनमुळे सलुन व्यवसायिकांना करावा लागतोय अर्थिक अडचणींचा सामना


आता तुम्हीच सांगा...  कुटुंबाचे पालन पोषण करायचे तरी कसे ?  लाॅकडाऊनमुळे सलुन व्यवसायिकांना करावा लागतोय अर्थिक अडचणींचा सामना

शिरूर प्रतिनिधी ( गजानन गावडे )

कोरोनाच्या प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सलुन व्यवसायाला लाॅक लागले असुन हातावर पोट असलेल्या नाभिक समाजाला कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या प्रश्नाने ग्रासले आहे.रेशनिंगवर धान्य तर मिळते परंतु तेल,मीठ,मसाला कसे आणायचे यांसारख्या मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असुन सरकारने सलुन व्यवसायिकांना अर्थिक मदत करण्याची मागणी नाभिक समाजाकडुन होत आहे.

            हातावर पोट असलेल्या सलुन व्यवसायिकांचे कुटंबाचे पालन पोषण हे रोज होणा-या व्यवसायातुन होत असते.परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन सलुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.ग्रमीण भागात व शहरी भागात सलुन व्यवसायीकांच्या काही दुकानात स्वतः एकटेच तर काही दुकानात दोन किंवा चार कामगार काम करत असतात.दुकानात जर एका दिवसाचा पाचशे रूपये व्यवसाय झाल्यास त्यातील संबंधीत कामगाराने केलेल्या कामातुन निम्मे पैसे कामगारास द्यावे लागतात मग त्या पैशावर दुकानदार व कामगार आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवतात.काही वेळेस कोरोनाच्या धास्तीने ग्राहकच नसल्याने व दररोज येणारे ग्राहकांची संख्या निश्चित नसल्याने कधी कधी काही वेळेस संपुर्ण दिवसभरात शंभर रूपयांच्या व्यवसायावरही तडजोड करत कसेबसे सलुन व्यवसायिकांना भागवुन घ्यावे लागत असुन गेल्या वर्षभरापासुन कोरोनामुळे व्यवसायाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. 

           त्यात ग्रामीण भागात दुकानांना व खोलीला काही प्रमाणात कमी भाडे असले तरी तेथील रोजचा होणारा व्यवसायही कमी असतो आणि भाडे व कुटुंबाच्या पालन पोषनाचा दैनंदिन खर्च हा असतोच.शेतीही नाही आणि काहींना असलीच तरी अल्प प्रमाणात असल्याने त्यावर कुटुंबाचा उदर्निवाह करणे शक्य होत नसल्याने उपजीवीकेचे दुसरे साधनही नाही.शहरी भागात दुकांना व राहत असलेल्या खोलीस भरमसाठ भाडे मोजावे लागते. अनेकांनी व्यवसायाच्या आधारावर बँकांकडुन कर्ज घेतलेले आहेत.कुटुंबात कोणी आजारी असल्यास त्याच्या उपचाराचा खर्च या सर्व अडचणींचा सामना सध्या गेले अनेक दिवसांपासुन व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजाला मोठ्या अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.ज्यांच्याकडे रेशनिंग कार्ड आहे त्यांना प्रशासनाच्यावतीने रेशनिंग दुकानातुन धान्य तर मिळते परंतु तेल,मीठ,मसाला कसे आणायचे हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहत असुन ज्यांचेकडे रेशनिंग कार्ड नाही त्यांचे पुढे ही सध्या कुटुंबातील आई वडील पत्नी व मुलांच पालन पोषन करताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.एकंदरीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या अनेक दिवसांपासुन सलुन व्यवसायाच्या दुकानांना लाॅक लागुन असल्याने मोठ्या अर्थिक अडचणीत सापडला असुन नाभिक समाजावर कुटुंबाचे पालन पोषन कसे करायचे ? खोलीचे,दुकाणाचे भाडे,बँकांचे हप्ते व वीज बील कसे भरायचे ? यांसारखे मोठे प्रश्न उभे राहिले असुन शासनाच्यावतीने सलुन व्यवसायिकांना महिना अर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सर्वत्र चालू असुन त्या अनुशंगाने शासनाने लॉकडाऊन लागू केलेले आहे. आमचे नाभिक व्यवसाय  बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनामुळे व्यवसायाची घडी पूर्णपणे विस्कटली असुन प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न  उभा राहीला आहे.अशा परिस्थितीत मायबाप शासनाने समाजाच्या  प्राप्त परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून अर्थिक मदतीचा हात देऊन नाभिक व्यवसायिकांना सावरणे खूप गरजेचे आहे.

                                           निलेश भोसले

                          अध्यक्ष,शिरूर शहर नाभिक संघटना


 

नाभिक समाजाचा व्यवसाय हा सेवा व्यवसाय असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने सलुन व्यवसाय बंद आहे.समाजासमोर रोजी रोटीचा प्रश्न उभा राहिला असुन गेल्या वर्षभरापासुन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.शासनाने समाजास अर्थिक मदत करावी तसेच वीज बील माफ करण्यात यावे.

                                        सचिन क-हेकर

                         सलुन व्यवसायिक,कासारी,ता.शिरूर


कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासुन सलुन व्यवसायाची घडी विस्कटली असुन कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांची संख्या कमी झालेली आहे.सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे सलुन व्यवसाय अनेक दिवसांपासुन पुर्णपणे बंद असल्याने नाभिक समाज अर्थिक विवंचनेत सापडला असुन वैद्यकीय खर्चासह कुटुंबाच्या पालन पोषनाच्या गरजा कशा भागवाव्यात यांसारख्या प्रश्नांनी ग्रासले असुन मायबाप सरकारने याबाबत सहानुभूतीने विचार करून मदत करणे गरजेचे आहे.

                                    रणजीत गायकवाड

                      माजी अध्यक्ष शिरूर शहर नाभिक संघटना

जाहिरात
Search
विडिओ
Recent News