प्रभाग क्रमांक १२ मध्ये लसीकरण सुरु करण्यात यावे माजी महापौर सुरेखा कदम यांचे मनपा आयुक्त यांना निवेदन


प्रभाग क्रमांक १२ मध्ये लसीकरण सुरु करण्यात यावे माजी महापौर सुरेखा कदम यांचे मनपा आयुक्त यांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु झाली  आहे.   नगर मध्ये मनपा हद्दी मध्ये लसीकरणाचे केंद्र कमी असल्याने लोकांचा मोठा गोंधळ उडत आहे . तसेच  आमच्या प्रभाग क्रमांक १२ ची लोकसंख्या २५ ते ३० हजार पाहता या भागातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेले मराठा सांस्कृतिक भवन येथे प्रशस्त पार्किग व सुसज्ज इमारत आहे . याच ठिकाणी हे  लसीकरण केंद्र सुरु करावे . त्यामुळे प्रभागातील नागरिकांची अडचण दूर होईल . तरी या बाबत आपण लवकर निर्णय घेण्यात यावा असे निवेदन माजी महापौर तथा प्रभाग १२ च्या नगरसेविका सुरेखा कदम यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहे 

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News