कानगांवला कोविड विलगीकरण कक्ष सुरू करा :भा.ज.पा.किसान मोर्चाचे माऊली शेळके याची  मागणी


कानगांवला कोविड विलगीकरण कक्ष सुरू करा :भा.ज.पा.किसान मोर्चाचे माऊली शेळके याची  मागणी

कुरकुंभ:प्रतिनिधी

 कानगांव (ता.दौड ) येथे कोविड विलगीकरण कक्ष व्हावा अशी मागणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर(माऊली) शेळके यांनी कानगांव ग्रामपंयात आपत्ती व्यवस्थापन समितीकडे केलेली आहे. या निवेदनात शेळके यांनी म्हटले आहे  कि, सध्या परिस्थितीमध्ये कानगांव गांव व परिसर कोविड -१९च्या आजारापासुन खुप त्रस्त झालेला आहे.गावामध्ये शेकडो रूग्ण कोरोना बांधित असुन हि बाब चिंताजनक आहे.या कालावधीमध्ये ज्या कोविड~१९ बांधित रूग्णांना हाँस्पिटलची गरज नाही परंतु त्यांना १००% (शंभर टक्के)समाजापासुन वेगळे राहण्याची गरज आहे.आशा रूग्णासाठी कोविड विलगीकरण कक्ष सुरु करणे अंत्यत गरजेचे असुन विलगीकरण कक्ष सुरु केल्याने कोविड -१९ च्या प्रार्दुभावा पासुन ग्रामस्थाचा बचाव होण्यास मदत होणार आहे.ग्रामपंचायतीसाठी कोरोना विषाणुमुळे उद्दभवलेल्या परिस्थितीत करावयाच्या उपाय योजना व खर्चाच्या मान्यते बाबत पुणे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दि ३०/०४/२०२१ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत स्तरावर वैद्यकिय अधिकारी, पँरामेडिकल स्टाफ/नर्सिंग स्टाफ यांची नेमणुक करणे बाबत तसेच ग्रामनिधी किंवा १४वित्त आयोगाच्या निधीतुन सदर स्टाफच्या मानधनाची रक्कम NHM/जिल्हा परिषद ने निश्चित केलेल्या दराने देण्यास परवागी देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा परिषद /माध्यमिक शाळा संस्थात्मक विलगीकरणास तयार करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे सदर विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी (उदा.पिण्याचे पाणी,शौचालय,स्वच्छता इ.)पुरवणे साठी ग्रामपंचायतीला खर्च करण्यास परवागी देण्यात आलेली आहे असे जिल्हा परिषदेकडुन परिपत्रक देण्यात आलेले असुनही आपणाकडुन सदर परिपत्रकाची प्रभावी अंमल बजावणी न झाल्याने प्राथमिक उपचारा अभावी अथवा विलगीकरण कक्ष सुरु न केल्याने कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढल्यास आणि त्यामुळे रूग्णाची जिवित्त हानी झाल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल यांची नोंद घ्यावी व लवकरात लवकर कोविड विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे या निवेदनावर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सरचिटणिस ज्ञानेश्वर शेळके,कानगांव ग्रामपंचायत सदस्य शरद चौधरी,माजी सदस्य भाऊसाहेब फडके याच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तर प्रजेने जायचे कुठे ...?

पुणे जिल्हा परिषदेने कोविड~१९ रोगाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक परवानग्या आणि अधिकार  ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेले असताना  ग्रामपंचायत प्रशासन मात्र हातावर हात ठेवुन बसले आहे परिणामी गावामध्ये कोरोणा बांधीताची संख्या वाढलेली असुन अनेकाचे मुत्यु देखील झाले आहेत. ग्रामस्थाची विलगीकरण कक्षाची मागणी योग्य आहे.परंतु ग्रामपंचायत प्रशासन सोईस्करपणे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे राजाच उधार झाला तर प्रजेने जायचे कुठे..?असा प्रश्न पडला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News