श्री बोरमलनाथ गोशाळा पुणे (मु.बोरीपlर्धी तालुका दौंड, जि.पुणे)


श्री बोरमलनाथ गोशाळा पुणे  (मु.बोरीपlर्धी तालुका दौंड, जि.पुणे)

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

दौंड येथील कारवाईत ताब्यात घेतलेल्या गावरान जातीच्या गाईचा डावा डोळा कॅन्सर च्या आजाराने त्रस्त होता. पीडित गाईवर  बोरमलनाथ गोशाळेत योग्य ते उपचार करण्यात आले. पण तरीही योग्य उपचार केल्यावर सुद्धा गाईचा डोळा वाचवण्यात अपयश आले. परंतु सदर गाईवर योग्य ती शस्त्रक्रिया करून गाईचा डोळा काढून टाकण्यात आला आणि ती शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. केडगाव येथिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पठाण व डॉक्टर राहुल लकडे यांनी गाईवर उपचार करून गाईचे प्राण वाचवले. श्री बोरमलनाथ गोशाळा आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मिळून या गाईला कॅन्सरच्या आजारातून मुक्त करून तिला जीवदानच दिले असे म्हणता येईल.अश्या अनेक गाईचा श्री बोरमलनाथ गोशाळा सांभाळ करते तसेच भाकड गाई, वयस्क झालेल्या गाई बैल, अपंग गाई आणि कत्तलखान्यात जातांना सोडवून आणलेल्या गायींची सेवा व संगोपन ह्या गोशाळेमार्फत केली जाते.सध्या गोशाळेत २१० गाई आहेत. दोन टन चाऱ्यासाठी रोज व्यवस्था केली जाते. लॉकडाऊन असल्यामुळे गोशाळा चालवणे अत्यंत कठीण जाते. त्यामुळे समाजातील गो प्रेमी व दानशूर व्यक्तींनी चाऱ्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News