बारामती तालुक्यात कोरोना लसीकरणावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा


बारामती तालुक्यात कोरोना लसीकरणावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारासोबतच लोकांच्या बेजबाबदारपणाचेही दर्शन

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर, होळ तसेच इतर ठिकाणीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणावेळी गर्दी दिसून आली.

कोरोनावर प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रक्रीया सध्या अनेक ठिकाणी सुरु आहे. मात्र हे लसीकरण करतांना पुर्वतयारी अगर नियोजन व्यवस्थित दिसून आले नाही. अनेक ठिकाणी सकाळपासूनच नागरिक लसीकरनासाठी आले होते आणि त्यानंतर त्याचे रुपांतर गर्दीत झाले आणि सोशल डिस्टंसिंगची वाट लागली. त्यातच ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या नावनोंदणीने मोठा गोंधळ उडाला सकाळीच दवाखान्याबाहेर जमलेले लोक पाहून स्थानिक ऑनलाईन नोंदणी केलेले लोकही याठिकाणी लसीकरणासाठी गोळा झाले. दवाखान्याबाहेरच सकाळपासून चाललेला हा गोधळ दुपारपर्यंत सुरुच होता. त्यानंतर यादित नावे असलेल्या लोकांनाच लस मिळणार हे समजल्यावर व ऑनलाईन नाव नोंदवूनही आम्हाला लस का नाही या कारणाने बरेचजण संताप व्यक्त करत होते.  वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन हे प्राथमिक आरोग्य केंद्र होळ याच्या अगदी नजिक असतानाही पोलिस वेळेवर पोहोचू शकले नव्हते. याबाबत अनेकांनी पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

सध्या महाराष्ट्र व देश कोरोना संकटाचा सामना करत असतांना नागरीक व प्रशासन यांचा असा हलगर्जीपणा कोरोनाचा विस्फोट होण्यास कारणीभुत ठरु शकतो. प्रशासनाने योग्य नियोजन करुनच लसीकरण कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News