दौंड शहरात किराणा दुकानातून 32 हजाराचा गुटखा जप्त, प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ यांची दबंग कारवाई


दौंड शहरात किराणा दुकानातून 32 हजाराचा गुटखा जप्त, प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ यांची दबंग कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

दौंड पोलीस स्टेशन येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून आलेले मयूर भुजबळ यांनी दोन महिन्यात अवैध धंदेवाल्यांना धडकी भरवली आहे, आज दौंड शहरातील खाटीक गल्ली येथील बेताल कॉलनीमध्ये एका किराणा दुकानावर छापा टाकून 32000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे,प्रोबेशनरी अधिकारी मयूर भुजबळ यांनी शहरातील खाटीक गल्ली मध्ये कॉलनी येथील किराणा दुकान या ठिकाणी छापा टाकला असता किराणा दुकानाचे मालक तायब अनिस शेख वय 26 यास अवैध गुटखा बाळगल्या प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस नाईक अण्णासो देशमुख यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 269, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 30 (2) (i) ,26,(2),(iv) कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या कारवाईमध्ये 32620 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे,ही कारवाई प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ पोलीस नाईक देशमुख,पो हवा गावडे,पो कॉ विशाल जावळे,किशोर वाघ,पी धावडे यांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News