रेमिडिसिवर चा काळाबाजार दौंडमध्ये उघड ॲक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शन आणून कुरकुंभ एमआयडीसी येथे काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी


रेमिडिसिवर चा काळाबाजार दौंडमध्ये उघड ॲक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शन आणून कुरकुंभ एमआयडीसी येथे काळया बाजाराने विक्री करणारे तिघे ताब्यात : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी 

दौंड शहरात एक महिन्या पूर्वीच रेमिडीसिवर काळ्या बाजारात विकताना आरोपी अटक केली होती,त्याच पद्धतीने कुरकुंभ येथे दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना अटक करण्यात आली आहे,

मा.पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयात कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने शासनाने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असल्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची प्रत्येक विभागात पथके नेमण्यात आलेली होती. 

     त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने  कुरकुंभ एमआयडीसी, रिलायन्स कंपनीचे गेटसमोर ता.दौंड जि.पुणे येथे छापा टाकून ॲक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करणारे तिघे आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून *१ ॲक्टेंमरा, ६ रेमिडीसिव्हर असे एकूण ७ इंजेक्शन जप्त* करण्यात आलेलले आहेत. 

     दि.९/५/२०२१ रोजी कुरकुंभ एमआयडीसी, रिलायन्स कंपनीचे गेटसमोर तिघेजण त्यांचेकडील होंडा ॲक्टीव्हा दुचाकी व सँट्रो कार मध्ये ॲक्टेंमरा व रेमिडीसिव्हर इंजेक्शनची काळया बाजाराने विक्री करत आहेत अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेने त्या ठिकाणी जावून सापळा लावला असता आरोपी नामे *१)दत्तात्रय मारुती लोंढे वय ३५ वर्षे रा.संम्मती अपार्टमेंट, प्लॅट नं.२०७, दौंड ता.दौंड जि.पुणे. मूळ रा.नवीन गार ता.दौंड जि.पुणे २)अदित्य अनिरुध्द वाघ वय २५ वर्षे रा.साईनाथनगर, पोफळे स्टेडीयमजवळ, निगडी, पुणे. मूळ रा.आणेवाडी ता.जि.सातारा ३)अमोल नरसिंग मुंडे वय रा.२५ वर्षे रा.कळवा नाका, सिध्दीविनायक सोसायटी, रुम नं.२०३, नवी मुंबई* हे तिघेजण ॲक्टेंमरा इंजेक्शन १,५०,०००/- (दिड लाख) रुपयाला एक व  रेमिडीसिव्हर इंजेक्शन २५,०००/- (पंचवीस हजार) रुपयाला एक असे विक्री करीत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून *१ ॲक्टेंमरा, ६ रेमिडीसिव्हर असे एकूण ७ इंजेक्शन कि.रु. ६०,६७५/- , रोख रक्कम ५१,१००/- रुपये, तीन मोबाईल कि.रु. ३०,०००/-, होंडा ॲक्टीव्हा दुचाकी किं.रु .७०,०००/- व सँट्रो कार किं.रु. १,५०,०००/ - असा एकूण किंमत रुपये ३,६२,१७५/- (सुमारे तीन लाख बासष्ट हजार एकशे पंच्याहत्तर) चा माल जप्त* करण्यात आलेला आहे.

     कोविड-१९  या साथीच्या आजाराचे औषध म्हणून वापरण्यात येणारे रेमिडीसिव्हर इंजेक्शन बेकायदेशिररित्या, अवैध व गैरमार्गाने मिळवून ते काळया बाजाराने स्वतःचे अर्थिक फायदयासाठी कोणताही परवाना नसताना विक्री करणेसाठी जवळ बाळगून औषध विक्रेते नसतानाही खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादकाने ठरविलेल्या एम.आर.पी. किंमती पेक्षा जास्त चढया बाजाराने विक्री करताना  मिळून आलेने तिघे आरोपींवर दौंड पोलीस स्टेशनला भादंवि क.१८८, औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी), जिवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७(१)(ए)(ii), औशधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(सी), २७(बी)(ii), २८, २२(१)(cca), २२(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

     सदर आरोपी हे ४०,०००/- रुपयाचे ॲक्टेंमरा इंजेक्शन १,५०,०००/- (दिड लाख) रुपयाला एक व ३०००/- रुपयाचे रेमिडीसिव्हर इंजेक्शन २५,०००/- (पंचवीस हजार) रुपयाला एक याप्रमाणे विकत असल्याचे व ते मुंबई येथून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी इंजेक्शन कोठून आणली? यामागे मोठे रॅकेट आहे काय? याबाबतचा पुढील अधिक तपास दौंड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.विवेक पाटील, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पो.नि. सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकेश कदम, प्रमोद नवले, अक्षय नवले, बाळासो खडके, प्रसन्न घाडगे यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News