दौंड शहरात जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल, दौंड शहरात अवैध धंद्यावर आवळतोय फास


दौंड शहरात जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर गुन्हा दाखल, दौंड शहरात अवैध धंद्यावर आवळतोय फास

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : दौंड -प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी अवैध धंद्यावर चांगलाच फास आवळला आहे, अवैध वाळू उपसा, अवैध वाळू वाहतूक, अवैध दारूधंदे तसेच जुगार अड्ड्यावर मयूर भुजबळ यांनी कारवाईचा धडाका लावला आहे, दौंड शहरातील गोवा गल्ली येथे तीन पत्ती जुगार चालल्याची पक्की खबर प्रोबेशनरी पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस नाईक वारे,पो कॉ किशोर वाघ,पो    कॉन्स्टेबल वाकळे,पो कॉन्स्टेबल कर्चे यांनी कारवाई केली असता त्याठिकाणी पत्र्याच्या खोलीमध्ये आठजण तीन पत्ते जुगार खेळत असल्याचे दिसून आले 26515 रुपये जप्त करण्यात आले,आणि संजय श्यामवेल गायकवाड रा गोवा गल्ली दौंड, अजय सुनिल वरपे राहणार नेहरू चौक, असलम रहीम सय्यद राहणार वडार गल्ली, विठ्ठल सुदाम गायकवाड राहणार वडार गल्ली, दिगंबर लक्ष्मण वाघमोडे राहणार सोनवडी, सिद्धार्थ गोविंद भडकुंबे राहणार पानसरे वस्ती, दिलीप दादा जाधव राहणार गोपळवाडी, मोसिन इक्बाल शेख गांधी चौक या आठ जणांवर पोलीस कॉन्स्टेबल किशोर वाघ यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम 188, 269, 270 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 887 कलम 4,5 साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 महाराष्ट्र covid-19 अधिनियम 2020 कलम 11 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती किशोर वाघ यांनी दिले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News