कोरोणाच्या पार्श्वभूमीवर भिंगार पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेफ्टी हेल्मेट व सॅनिटायझर वाटप. भिंगार सामाजिक ग्रुपचा सामाजिक उपक्रम.


कोरोणाच्या पार्श्वभूमीवर भिंगार पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेफ्टी हेल्मेट व सॅनिटायझर वाटप. भिंगार सामाजिक ग्रुपचा सामाजिक उपक्रम.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर भिंगार सामाजिक ग्रुपच्या वतीने भिंगार पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी हेल्मेट व सॅनिटायझर वाटप करण्यात आले भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे साहित्य देऊन वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते भारत पवार, मतीन सय्यद, मलूराज औटी, प्रमोद भाळवणकर, मनीलाल पटेल, राम जरांगे, प्रवीण गाली आदी सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                   

            पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे व कोरोणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने त्यांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे भारत पवार यांनी सांगितले तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भिंगार सोशल ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News