केशव गोविंद संस्थानने ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सुरु करावी - रोडे


केशव गोविंद संस्थानने ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सुरु करावी - रोडे

राहुरी फॅक्टरी, विजय भोसले, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी

आंबी - बेलापूर खुर्द येथील श्री हरिहर केशव गोविंद बन संस्थानने पंचक्रोशीतील नागरिकांसाठी ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी संस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव भगत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

        निवेदनात म्हंटले आहे की, सध्या देशासह संपूर्ण राज्यात कोरणा संसर्गाने थैमान घातलेले असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध  होत नसल्याने रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट सुरू असून काही रुग्णवाहिका रुग्णांना वेठीस धरून रुग्णांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहे. या अडचणींचा विचार करून राज्यात नावाजलेल्या व ब वर्ग दर्जा असलेल्या श्री हरिहर केशव गोविंद बन संस्थानने परिसरातील रुग्णांसाठी अद्ययावत ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.

       या वैश्विक महामारीच्या काळात संस्थानचे योगदान अत्यंत गरजेचे असून परिसरातील बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द, उक्कलगाव, आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव आदी पंचक्रोशीतील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी या रुग्णवाहिकेचा फायदा होईल. यामुळे लवकरात लवकर आपल्या नावलौकिक प्राप्त संस्थानमार्फत रुग्णवाहिकेची उपलब्धता व्हावी अशी विनंती रोडे यांनी केलीआहे. या निवेदनाची प्रत रोडे यांनी धर्मादाय उप आयुक्त, जिल्हाधिकारी, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, बेलापूर खुर्दचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना पाठवली आहे.

मागील वर्षांपासून कोरोनाचा फटका श्री हरिहर केशव गोविंद संस्थांनला बसला असून उत्पन्नात घट झाली आहे. उत्पन्नाचे इतर स्त्रोत नसल्यामुळे निधीची मोठी अडचण येत आहे. संस्थांमार्फत भविष्यात रुग्णवाहिका सुरू करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल.  - ज्ञानदेव भगत (अध्यक्ष - श्री हरिहर केशव गोविंद बन संस्थान)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News