जनशक्ती च्या मागणीला यश : प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणास सुरवात.


जनशक्ती च्या मागणीला यश : प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर लसीकरणास सुरवात.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

तालुक्यात कोविड -१९ प्रतिबंधित लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा तसेच कोविड-१९ प्रतिबंधित लस घेण्याची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये देखील उपलब्ध व्हावी अशी मागणी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने  जि.प.सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे  इमेल द्वारे केली होती, आज त्या मागणीला यश आले आहे. त्याबद्दल जनशक्तीच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे. प्रत्यक्ष रित्या कोविड १९ प्रतिबंधक लस प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर  उपकेंद्रावरही देण्यास सुरुवात झाली आहे.  कोविड-१९ साथीचा प्रसार शेवगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे. ग्रामीण भागात १०० % लसीकरण होणे गरजेचे आहे, मात्र लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची मोहीम खंडित होताना दिसत होती. एका आरोग्य केंद्रावर दिवसात फक्त अंदाजे २०० व्यक्तींनाच लस दिली जाते. एकूणच खेड्यातील आकडेवारी पाहता ४५ वर्षावरील वय असलेल्या बोटावर मोजतायेतील इतक्याच लोकांचे लसीकरण झाले आहे.

एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंदाजे १६ ते २० गावे येतात. अशा परीस्थितीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या व अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या पाहता वेळेत लसीकरण होणे अशक्य होते ते चित्र आता बदलणार आहे. त्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या प्रवाशी वाहतूकीमुळे ग्रामीण भागातून १५ ते २० कि.मी. अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाणे ग्रामस्थांसाठी गैरसोयीचे होते तो त्रासही आता होणार नाही. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जास्तीची गर्दी होऊन साथीचे संक्रमण होण्याची भीती आपण नाकारु शकत नव्हतो. नवीन शासन निर्णयानुसार १ मे २०२१ पासून १८ वर्षापुढील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. 

एकूणच कोविड-१९ चा सामना करत असताना व संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कमी दिवसात संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुबलक लसीचा पुरवठा होणे देखील तितकेच गरजेचे आहे. तालुक्यात सुसज्ज अश्या इमारतीसहन सुख-सुविधा असलेल्या गोळेगाव, लाडजलगाव यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथेही लसीकरणाची सुविधा उपलब्ध झाल्याने लसीकरण लवकरच होईल असे वाटते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News