कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार कर्जत तालुक्यासाठी कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे पवारांना सचिन पोटरे यांचे पत्र


कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार कर्जत तालुक्यासाठी कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे पवारांना सचिन पोटरे यांचे पत्र

प्रिय आ.रोहित दादा पवार साहेब

सप्रेम नमस्कार  

कर्जत प्रतिनिधी मोतीराम शिंदे : कर्जत येथील भाजपाचे अहमदनगर जिल्हा प्रशिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी कुकडीच्या पाण्या संदर्भात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना शेलक्या भाषेत पत्र लिहून कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेचे कुकडीचे आवर्तन वेळेवर सोडण्यात न आल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हे या पत्रातून सचिन पोटरे यांनी प्रकाश टाकला आहे. पोटरे या पत्रातून म्हणतात की आमदार पवार साहेब जनतेने तुम्हाला दिलेल्या भरभरून प्रेमामुळे व आपण देशाचे नेते  श्री. शरद पवार  साहेब यांचे तुम्ही नातू असल्याने या मतदारसंघात आता जादू होऊन काहीतरी जगापेक्षा वेगळं दिसेल अशी भोळी भाबडी आशा आमच्या जनतेच्या झाल्या होत्या त्यात त्यांची काडीचीही चूक नाही. कारण त्यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट व इतर अनेक व्यवस्थेने तसे वातावरण तयार केले गेले होते . असो या कोरोनाच्या काळात ही यावेळी मागच्या पेक्षा आपली सक्रियता चांगली आहे. राजकारणात आशा गोष्टी होतच राहतात परंतु आपणा ला महाराष्ट्रात व  राष्ट्रवादीच्या अंतर्गत च्या राजकारणात प्रोजेक्ट करत असताना तुम्ही आमच्या कर्जत तालुक्याच्या च्या मूलभूत प्रश्नांकडे खूपच दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर आम्हाला रस्त्यांवर उतरून आवाज उठवावा लागला व अनेक प्रश्न निकाली ही लागले दादा आपण निवडून आल्या पासून कुकडीच्या पाण्याच्या आवर्तनात कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर खूपच अन्याय होतोय . कुकडीच्या पाण्याच्या राजकारणात तुम्ही पुणे जिल्ह्याला झुकते माप देत आहात हे स्पष्टपणे आम्हाला दिसतंय कारण मागच्या महिन्यात विविध वृत्तपत्रात  कुकडीचे पाणी पुणे जिल्ह्याने पळवले  आशा हेडिंगच्या बातम्या श्रीगोंदा पारनेर व कर्जत तालुक्यातून लागल्या यावर विरोधक म्हणून आम्हीही तुमच्या सहित तुमच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात प्रश्न उपस्थित केले परंतु कोणीच याची दखल घेतली नाही माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सण २०१४ पासून आपण निवडून येईपर्यंत कुकडीची आवर्तने एकदम नियमितपणे व सुरळीत चालू होते  परंतु तुम्ही कायम राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रतिक्रिया देत आहात त्याच वेळी देशाचे पंतप्रधान ते महाराष्ट्राच्या राजकारणावर ही आपले नेहमी मत व्यक्त करत असतात. त्यानिमित्ताने आपला मतदारसंघ चर्चेत राहतोय मात्र कुकडीच्या आवर्तनासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी व त्यांची शेती आसुसलेली आहे. हे तुमच्या  लक्षात कस येत नाही   कुकडीचे पाणी ही कर्जत तालुक्याची अस्मिता आहे व या अस्मितेच्या राजकारणात तुम्ही मॅनेज झालेले दिसताय. तुम्ही कुकडीच्या पाण्यासाठी पुणे जिल्यातल्या लोकप्रतिनिधी बरोबर का भांडत नाहीत ?  आत्ताच्या ९मे २०२१ ला जर पाणी सुटणार असेल तर करमाळ्यात तेच पाणी १६ तारखेपर्यंत पोहचेल मग तिथे आठ दिवस पाणी सोडणार असतील तर ते पाणी २५ मे पर्यंत करमाळा तालुक्यात राहील आणि मग २५ मे पासून कर्जत तालुक्याला १० दिवस पाणी म्हणजे ५ जून पर्यंत ते पाणी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे तोपर्यंत पावसाळा चालू झालेला असेल व थोडीफार राहिलेली पिके हातची निघून गेलेली असतील व मग नंबर श्रीगोंद्याचा व पारनेर तालुक्याचा  पावसाळ्यात पाणी म्हणजे  कुकडीच्या पाण्याचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे  हे तुमच्या कसे लक्षात येत नाही दादा कोरोनाचा काळ होता म्हणून ठीक नाहीतर कर्जत तालुका आंदोलनाचा जनक आहे याच कर्जत मधे मराठा क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत. येथेच आमच्या कोपर्डी च्या ताई ला न्याय मिळण्यासाठी मशाल पेटवली गेली होती. आणि याच अग्निकुंडात आम्ही कायम सक्रिय आहोत कदाचित आमचं दुर्दैव हे असेल आणि तुमचं नशीब की आम्हाला पवार साहेबांच्या एव्हढा मोठा आजोबा नाही. परंतु या गोष्टीचा फायदा तरी आम्हाला मिळवून दिला पाहिजे. गेली काही वर्षे आम्ही कायम रस्त्यांवर लढतोय त्यामुळे तुम्ही फार काळ आम्हाला दुर्लक्षू शकणार नाहीत कोरोनाच्या काळात शेतकरी अजून मेटाकुटीला आला असून भविष्यात तरी कुकडीच्या पाण्याचा खेळखंडोबा होणार नाही याची काळजी घ्या दादा. असे खरमरीत पत्र आमदार रोहित पवार यांच्या नावाने भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

तरी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या जळजळीत वास्तव वादी पत्राची दखल घेऊन भविष्यात कर्जत जामखेड तालुक्यातील विकास कामांची व कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची तसदी घ्यावी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News