राहुरी अर्बन कडून तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला औषधांची मदत..


राहुरी अर्बन कडून तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला औषधांची मदत..

राहुरी फॅक्टरी, महाराष्ट्रभुमी प्रतिनिधी-विजय एस भोसले

राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने   राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय कोविड सेंटरला  औषधांची मदत देणेत आली.  

      देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरला  मान्यवरांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काही औषधे, फळे आदी गोष्टींची गरज असल्याची बाब लक्ष्यात घेऊन दात्यांनी मदत करण्यासाठी समोर येण्याचे आवाहन सोसिएल मेडिया च्या माध्यमातून आवाहन करणेत आले होते, त्या आवाहणास प्रतिसाद देत अनेक दाते मदतीसाठी धावले असून राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने राहुरी  तालुक्यातील देवळाली प्रवरा, टाकळी मिया, वांबोरी, कृषी विद्यापीठ, आणि राहुरी शहर आदी ठिकाणी सुरू असलेल्या सर्व शासकीय कोविड सेंटर साठी कफ सिरफ हे औषध उपलब्ध करून देण्याचा निर्णय राहुरी अर्बन निधी संस्थेचे वतीने घेण्यात आला. व आज संस्थेचे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे व आप्पासाहेब ढुस यांचे हस्ते पन्नास लिटर औषध राहुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. दिपाल गायकवाड आणि तहसीलदार फसियोद्दीन शेख साहेब यांचेकडे सुपूर्द करणेत आले. 

        या प्रसंगी श्रीरामपूर चे प्रांत डॉ दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख, राहुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोविंदा खामकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिपाली गायकवाड,  देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत, राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुर्हे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, डॉ. श्रीकांत पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News