शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोना रूग्णांसाठी जमा केलेला सुमारे पाच लाख एक हजार एक रूपयांचा निधी


शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोना रूग्णांसाठी जमा केलेला सुमारे पाच लाख एक हजार एक रूपयांचा निधी

- शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी कोरोना रूग्णांसाठी जमा केलेला सुमारे पाच लाख एक हजार एक रूपयांचा निधी जि. प . अध्यक्षा राजश्री घुले यांच्याकडे सुपूर्द करताना नोडल अधिकारी शैलजा राऊळ व  प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

कोरोना संकट काळाच्या दुस-या लाटेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी सर्वांत आधी  मदत निधी स्वयंप्रेरणेने जमा केला. जिल्ह्यात अन राज्यात त्याचे अनुकरण झाले.  तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी राज्याला दिशादर्शक व  आदर्शवत ठरली याचा निश्चितच आनंद वाटला. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

कोरोना संकट काळात तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन जमा केलेला सुमारे पाच लाख एक हजार एक रूपयांच्या निधीचा धनादेश नोडल अधिकारी शैलजा राऊळ व संघटना समन्वय समितीच्या सदस्यांनी आज बुधवारी ( दि. ५ मे ) रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्याकडे सुपूर्द केला. तहसिलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे आदी उपस्थित होते. या वेळी त्या बोलत होत्या.

नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांच्या आवाहनानुसार कोरोना संकट काळात शेवगाव तालुक्यात रूग्णसंख्या वाढत असताना शेवगाव तालुक्यातील  प्राथमिक शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने कोव्हिड रूग्णांच्या मदतीसाठी निधी संकलन केले होते. सभापती डॉ. क्षितीज घुले पाटील व गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी ही या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले होते. कोरोना संकट काळात एप्रिल महिन्यात प्राथमिक शिक्षकांनी नोडल अधिकारी राऊळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन चार दिवसांतच पाच लाख एक हजार एक रूपये निधी संकलीत केला होता. त्याचे अनुकरण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत झाले. राज्यातही अनेक ठिकाणी असे उपक्रम सुरू झाले. शेवगावचा आदर्श जिल्हयाने अन राज्याने घेतला ही बाब खूप महत्वाची असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा घुले यांनी सांगीतले.

या वेळी प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक रघुनाथ लबडे , विनोद फलके यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

चौकट - १)  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे गत वर्षापासून ऑनलाईन - ऑफलाईन शैक्षणिक काम करीत आहेत. कोरोना काळात अनेक कर्तव्य निभावत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे योगदान दिशादर्शक आहे.  त्यांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रयत्नशील आहे. - डॉ. क्षितीज घुले, सभापती, पं. स. शेवगाव.

२) जिल्हा परिषदेचे कर्मचारी म्हणून प्राथमिक शिक्षक तळमळीने काम करतात. कोरोना संकट काळात प्राथमिक शिक्षकांची बांधिलकी  समाजाला दिशादर्शक आहे. - शैलजा राऊळ, नोडल अधिकारी, कोव्हिड सेंटर, शेवगाव.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News