भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी:महात्मा फुले समता परिषदेची मागणी


भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी:महात्मा फुले समता परिषदेची मागणी

सुरेश बागल दौंड:प्रतिनिधी

अन्नपुरवठा व सुविधा मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल एकेरी उल्लेख आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. याविषयी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दि.४ रोजी यवत पोलीस ठाण्यातनिवेदन दिले आहे.काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर सुटला आहात,आणि आतमध्ये टाकू अशी धमकी दिली असा आरोप करीत दौंड तालुक्यातील विविध ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या व्यक्तव्याचा निषेध केला आहे. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते आहेत,ओबीसी संघटना अशा धमक्या खपवून घेणार नाही .चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या निवेदमध्ये दिलेला आहे . महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल लडकत,महिला जिल्हाध्यक्षा ज्योती झुरुंगे,जिल्हाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल,दौंड तालुकाध्यक्ष सचिन रंधवे,जिल्हाध्यक्ष बापूसाहेब मेहेर,कार्याध्यक्ष मंगेश रायकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे आदींच्या सह्या या निवेदनावरआहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News