विजय चौक(झेंडा)व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !


विजय चौक(झेंडा)व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

श्रीगोंदा प्रतिनिधी- अंकुश तुपे  श्रीगोंदा तालुक्यातील घारगावं,कोळगाव,पिंपळगाव पिसा,बेलवंडी बु ,लोणी व्यंकनाथ येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला   विजय चौक(झेंडा)व्यापारी

मित्रमंडळाच्या वतीने खाद्यपदार्थ तसेच रुग्णांना स्वच्छ पिण्याचे पाणी, बिसलेरी बॉक्स, इत्यादी पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

   यावेळी विजय चौक(झेंडा)व्यापारी मित्रपरिवाराचे राजूशेठ नय्यर,नितिन सुर्यवंशी,अमित बगाडे,शाम शिंदे,अजित पाटील,विशाल बगाडे,अमोल दंडनाईक,विशाल दंडनाईक,,अतुल बगाडे,नारायण ढाकणे यांनी सदर रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून आपण या आजारातून लवकरचं बरे व्हाल अशी खात्री देत त्यांच्या आरोग्यासाठी विश्वप्रार्थना करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News