रोटरी क्लब भिगवण आणि कात्रज यांच्या वतीने कोवीड सेंटरला फ्रीज आणि टेबल फॅन भेट - संपत बंडगर


रोटरी क्लब भिगवण आणि कात्रज यांच्या वतीने कोवीड सेंटरला फ्रीज आणि टेबल फॅन भेट - संपत बंडगर

भिगवण (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब ऑफ  कात्रज पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी चिंचोली येथील कोवीड केअर सेंटरला  फ्रिज व टेबल फॅन्स भेट देण्यात आल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष संपत तात्या यांनी दिली.

यावेळी स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये फ्रिज व टेबल फॅन चा लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत ,अध्यक्ष संपत बंडगर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, डॉ. अपर्णा शिंदे,नानासाहेब मारकड,डॉ. अमोल खानावरे, संजय चौधरी, रियाज शेख ,प्रदीप  ताटे, कमलेश गांधी संतोष सवाणे,औदुंबर हुलगे,तानाजी खटके आदी मान्यवर उपस्थित होते.

ऱोटरीचे अध्यक्ष बंडगर यांनी सांगितले की, राज्यामध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी शासनाच्या वतीने ठिकठिकाणी कोवीड सेंटर उभे करुन रुग्णाना सेवा दिली जात आहे. या स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये दिवसाला १५०च्या आसपास कोवीड रुग्णाची तपासणी केली जात आहे.त्यांच्या स्वॅब कलेक्सन करीता फ्रीज ची गरज लक्षात घेउन भिगवण आणि कात्रज पुणे येथील रोटरीच्या वतीने फ्रिज आणि टेबल फॅन भेट देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत आम्ही रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे संपत बंडगर यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News