केदारेश्वर देवस्थानला आठरा लाखाचा निधी जिःल्हापरीषद सदस्य हर्षदा ताई काकडे


केदारेश्वर देवस्थानला आठरा लाखाचा निधी जिःल्हापरीषद सदस्य हर्षदा ताई काकडे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेमधून भक्तनिवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या कामांसाठी १५ लाख रुपये  व सार्वजनिक शौचालय करिता ०३ लाख रुपये मंजूर केल्याने देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प. बाबागिरी महाराज यांनी जि.प.लाडजळगाव गटाच्या सदस्या सौ.हर्षदाताई काकडे व जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.विद्याधर काकडे यांचे अभिनंदन करत आभार मानले. यावेळी ते बोलत होते.

बोलताना बाबागिरी महाराज म्हणाले की, तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असे श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची नेहमीच गर्दी असते. तालुक्यातील प्रसिद्ध व हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असून देखील आजपर्यंत  हे देवस्थान मूलभूत सुविधापासून व शासकीय विकासकामापासून वंचित राहिले होते. मात्र जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.विद्याधर काकडे व जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी लक्ष देऊन या देवस्थानला उर्जित अवस्था प्राप्त केली आहे. ताई यांनी वारंवार शासनाकडे या देवस्थानच्या विकासासाठी पाठपुरावा करून श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ‘क’ वर्गात समावेश करून घेतला आणि भक्तनिवास इमारतीस २० लाख रुपये मंजूर करून घेतले होते. यामध्ये भक्तनिवास इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या मजल्याच्या कामांसाठी १५ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये मंजूर केले आहेत. तसेच या देवस्थानला येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छता गृह बांधण्यासाठी ३ लाख रुपये मंजूर केले आहे. सौ.काकडे ताई यांनी लाडजळगाव गटात निवडून आल्यावर गटात विकासाची मालिका जणू आखली आहे. आजपर्यंत विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या या देवस्थानचा अवघ्या तीन वर्षात झपाट्याने विकास झाला आहे असेही ते बोलताना म्हणाले. यावेळी देवस्थानच्या वतीने तसेच गोळेगाव, नागलवाडी सह परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सौ.काकडे यांचे आभार मानण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News