पळशीत (कोविड केअर सेंटर) विलगीकरण कक्ष सुरु


पळशीत (कोविड केअर सेंटर) विलगीकरण कक्ष सुरु

बारामती : प्रतिनिधी  (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता विद्यानंद ऍग्रोचे अध्यक्ष आनंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.सौ. शोभाताई लोखंडे कोविड केअर सेंटर (विलगीकरण कक्ष) पळशी याठिकाणी नुकतेच सुरु करण्यात आले आहे.

   कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाबाधित संख्या अधिक पटीने वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन तसेच उपचार सुविधा देखील न मिळाल्यामुळे कोरोना बाधित रुग्नांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे अशा या परिस्थितीमध्ये गावातील नागरिकांची वाताहत, हाल होवू नयेत यासाठी त्यांना आपल्या गावातच सुविधा व उपचार उपलब्ध व्हावेत आणि संबंधित रुग्ण गावातच रिकव्हर व्हावा यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गंभीर परीस्थितीच्या जाणिवेतून आनंद लोखंडे व त्यांचे पळशीतील मित्र राहुल हाके यांनी विद्यानंद फाऊंडेशनच्या माध्यमातून पळशी गावच्या नागरिकांसाठी ३० बेडचे सुसज्ज सुविधा असलेल्या विलगीकरण कक्षाची (कोव्हीड केअर सेंटरची) उभारणी केली आहे.

   याप्रसंगी विद्यानंद फाऊंडेशनचे चेअरमन आनंद लोखंडे, विद्यानंद फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती निंबाळकर, सरपंच रावसाहेब चोरमले, माजी उपसरपंच संदिप कोळेकर, सदस्य लखन कोळेकर, राहुल हाके, लोणीभापकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज माने, ग्रामसेविका दीपाली हिरवे, आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News