पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे यांच्यातर्फे करडवाडी येथे सॅनिटायझर, मास्क व विटामिन च्या गोळ्या वाटप


पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे यांच्यातर्फे करडवाडी येथे सॅनिटायझर, मास्क व विटामिन च्या गोळ्या वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )           

पाथर्डी तालुक्यातील कराड वाडी येथे पुलगाव पोलिस स्टेशनचे सोमनाथ टापरे यांच्या तर्फे सॅनिटायझर, मास्क तसेच औषधी विटामिन च्या गोळ्या चे वाटप करण्यात आले.सध्या सर्वत्र कोरोना महामारी चे संकट असल्याने श्री टापरे यांनी त्यांच्या मूळ गावी जनतेसाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक औषधे गोळ्या ,सनीटायझर, मास्क कराडवाडी येथील ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व वस्तूंचे वाटप मराठी शाळेत करण्यात आले यावेळी सर्व धोरणाच्या नियमांचे पालन करून ग्रामस्थांना चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष टापरे विजय राठोड, संजय कराड, संदीप कराड, तसेच कराड वाडी तरुण मंडळ व ग्रामपंचायत आदींचे सहकार्य लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News