नगरमध्ये मनसेच्या आंदोलनाची दखल घेऊन लसीकरण मोहीम पुन्हा सूरू


नगरमध्ये मनसेच्या आंदोलनाची दखल घेऊन लसीकरण मोहीम पुन्हा सूरू

लसीकरण करिता आरोग्य कर्मचाऱ्यांना दबाव, आणतात अश्या नगरसेवक, राजकिय नेत्यांवर गुन्हे दाखल करा.

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरात आपल्या समर्थकांचे त्यांच्या घरातील सदस्यांचे लसीकरण मागच्या दाराने करण्याकरीता आरोग्य कर्मचाऱ्यांना दमदाटी, दबाव आणण्याचा प्रकार शहरातील  नगसेवक तसेच स्थानीक राजकीय नेते करत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन मध्ये उभे राहून सुध्दा आश्या राजकिय लोकांमुळे लस मिळत नाही ह्या घटना नगर शहरातील लसीकरण केंद्रावर घडतांना दिसत आहे. त्यामुळे नगरसेवक, राजकिय नेते यांच्या समर्थकांचे घरातील सदस्यांचे मागच्या दाराने होणारे लसीकरण बंध करा. व जो नगरसेवक राजकिय नेते आरोग्य कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दमदाटी लसीकरण करण्या करिता करत असेल अश्या लोकांवर गुन्हे दाखल करा. तसेच नगरसेवक, राजकिय नेते यांच्या समर्थकांचे, घरातील सदस्यांचे लसीकरण नियमांप्रमाणे लाईन मध्ये उभे राहून करुण घ्या. जेणेकरून उन्हातान्हात उभे राहून ताटकळत सर्वसामान्य , ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण करता येईल व सर्वांना सारखा न्याय मिळेल अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देऊन केली आहे.

  शहरातील नगरसेवक राजकिय नेते त्यांच्या समर्थकांचे लसीकरण करण्या करिता दबाव आणतात धमकी देतात त्यामुळे आरोग्य कर्मचारी यांनी आयुक्तांच्या आदेशाने लसीकरण काही काळ थांबवले परंतू मनसेच्या नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले व काही वेळातच आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण चालु केले आंदोलना मुळे लसीकरण पुन्हा सुरळीत सुरू झालेपोलिस प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन लसीकरण मोहीम पुन्हा सूरू केली 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News