लोणी भापकर येथील श्री काळभैरवनाथ यात्रा रद्द, सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन


लोणी भापकर येथील श्री काळभैरवनाथ यात्रा रद्द, सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)बारामती तालुक्यातील लोणीभापकर याठिकाणी श्री काळभैरवनाथ आई जोगेश्वरी लग्न सोहळा सोमवार दि.०३ मे रोजी सायंकाळी ६.५० वा. ५ व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व गावच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मा. जिल्हाधिकारीसो यांचे आदेशानुसार जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे फक्त ५ व्यक्तींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे. बाकीचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत तसेच लोणीभापकर गाव कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणे मंदिर परिसरात गर्दी न करता आपापल्या घरातूनच देवाचे नाव घेऊन अक्षदा टाकावयाच्या आहेत. नैवेद्य दाखवायला कोणीही मंदिरात येऊ नये.

        सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करायचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आपणावर होणाऱ्या कारवाईस आपण स्वतः जबाबदार असाल. असे लोणी भापकरचे सरपंच रवींद्र भापकर यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News