कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघाचा यात्रोत्सव रद्द


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघाचा यात्रोत्सव रद्द

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत )- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांचा बुधवार दि.5 मे रोजी होणारा यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत ग्रामस्थांनी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देवाचे भगत नामदेव भुसारे व ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी दिली. 

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. मोठ्या संख्येने कोरोनाचे संक्रमण वाढत असताना सरकारने टाळेबंदी घोषित करुन, सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आनली आहे. गावातील सर्व मंदिर, मस्जिद व धार्मिक स्थळे बंद आहेत. गावात दरवर्षी श्री बिरोबा महाराजांची यात्रा उत्साहात साजरी केली जाते. मागील वर्षी देखील कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी देखील कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ व यात्रा उत्सव कमिटीने घेतला आहे. गावात यात्रेनिमित्त प्रवरा संगम येथे गंगाजल आनणे, मिरवणुक, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम, कुस्ती हगामा रद्द करण्यात आला आहे. यात्रेच्या दिवशी फक्त देवाचे भगत बिरोबाची विधीवत पूजा करणार आहे. भाविकांनी घरातच राहून बिरोबाची आराधना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News