पळशीत महाराष्ट्र व कामगार दिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण


पळशीत महाराष्ट्र व कामगार दिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण

लोणी भापकर : 

महाराष्ट्र दिन व कामगार दिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पळशी (ता.बारामती) याठिकाणी शनिवार दि.१ मे २०२१ रोजी भारतीय पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

सध्या कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढत असून केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी झाडे लावून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, संघटक मोहम्मद शेख, पत्रकार हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर इ. उपस्थित होते.

: पळशीत महाराष्ट्र व कामगार दिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करताना संघांचे पदाधिकारी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News