मदनवाडी येथे रक्तदान शिबिरात 43 बाटल्यांचे संकलन


मदनवाडी येथे  रक्तदान शिबिरात 43 बाटल्यांचे संकलन

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त  मदनवाडी चौफुला येथे रक्तदान शिबिरात 43 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि शिवशंभू चॅरिटेबल व श्रीनाथ म्हास्कोबानाथ शिक्षण संस्था यांच्या सयुक्तीक विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

मदनवाडी येथील रक्तदान शिबीराचे उद्घघाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज भरणे व  अनिकेत भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सचिन बोगवत ,धनाजी थोरात , विष्णुपंत देवकाते ,सतीश बंडगर,शरद चितारे, संजय देवकाते ,संजय शिंदे  निलेश गायकवाड ,दिनेश शिंदे ,मनसु शिंदे,दीपक शिंदे,विठ्ठल दगडे ,विशाल गुरगुळे,नितीन बंडगर, संपत कारंडे आदी उपस्थित होते 

रक्त हे निसर्गनिर्मित आहे त्याची कोणत्याही प्रकारे निर्मिती करता येत नाही, ते फक्त मानवी शरीरातच निर्मित होते. हे खूप अमूल्य मानले जात. जीवनातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान करण्यास हातभार लावण्यासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं होतं, या आवाहनाला 43  दात्यांनी  प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र येणाऱ्या काळात युवकांना लसीकरण मोहीम सुरू होणार असल्याने 58 दिवस रक्तदान करता येणार नसल्याने रक्ताचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या वेळी खूप अडचणी येतात आणि या अडचणींना सामोरे जाव लागत असत, पुढील कोरोना काळात  कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी रक्ताची गरज लागली तर  गरजूंना रक्तपुरवठा केला जाईल असे सतीश शिंगाडे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News