रक्तदान करणे म्हणजे इतरांना जीवदान देणे :- विनोदभाऊ परदेशी


रक्तदान करणे म्हणजे इतरांना जीवदान देणे  :- विनोदभाऊ परदेशी

खानापुरात महाराष्ट्र दिनाचे अवचित्त साधून भव्य रक्तदान शिबीर संपन्न....!

शेवगाव/प्रतिनिधी सज्जाद पठाण

रक्तदान करणे म्हणजे इतरांना जीवदान देन्यासारखे आहे त्यामुळे रक्तदानाबद्दल जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. रक्तदान हा एक स्तुत्य उपक्रम असून रक्तदान ही एक लोक चळवळ व्हावी यासाठी लोक सहभाग महत्वाचा असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन ही चळवळ बळकट करावी. तसेच रक्तदान हे आपल्या सर्वांना एकत्र येण्याचा बंधुत्वतेचा, समानतेचा, सामाजिक एकतेचा संदेश देतो, रक्तदान हे आपल्याला जगण्याचे शिकवतो. रक्तदान ही अशी चळवळ आहे की ती आपल्या मधील सामाजिक दरी दूर करू शकते असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ परदेशी यांनी केले. शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे १ मे महाराष्ट्र दिनाचे अवचित्त साधून तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रवक्ते अजय बारस्कर उद्योजक माननीय संतोष जी पवार साहेब व स्थानिक कार्यकर्ते उमेश्वर मोरे, श्रीराम पातकळ, शंकरराव नेमाने, याच्या पुढाकारातुन व संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष कल्पेशराव दळे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिरिक्त खर्चाला फाटा देत खानापूर ता ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या शिबिरात महाराष्ट्र राज्य एन जी ओ फाऊंडेशनचे अध्यक्ष दिपकराव आगळे यांच्या वतीने कल्पेशराव दळे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून गावात मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ परदेशी हे बोलत होते. यावेळी प्रहारचे जिल्ह्याध्यक्ष विनोदभाऊ परदेशी, सचिव प्रकाश बेरड, तालुका अध्यक्ष संदीप बामदळे, डॉक्टर दादासाहेब काकडे यांनी रक्तदात्यांना संबोधित केले पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, जोहरापूरचे माजी सरपंच अशोकराव देवढे, संघर्ष महिला फाउंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा तारामती दिवटे, महाराष्ट्र राज्य ऐन जो ओ संघटनेचे अध्यक्ष दीपक आगळे, डॉ काकडे, शंकरराव नेमाने, विनाताई अंधारे, प्रमिला रंगदिवे, संगीता गाढे, तात्यासाहेब थोरात, युवा नेते देविदास पातकळ, गणेश पातकळ, संतोष थोरात, अभय थोरात, रमेश पातकळ, संतोष गुजर, अनिल चेडे,  संदीप दळे, शेखर आव्हाड, दत्तात्रय दळे, शिवाजीराव डांगे, अशोक भेंडेकर, तसेच अहमदनगर जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉ संध्या इंगोले, अमृत जांबरे, ज्ञानेश्वर मगर, मोहन पोकळे, स्नेहल सावंत, विकास गटकळ, बाळू वीर यांच्यासह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहारचे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे तसेच आभार देविदास पातकळ यांनी मानले असून सदरील कार्यक्रम हा कोविड १९ चे नियम पाळून करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News