यवतचे उपसरपंच श्री. सुभाष बापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त यवत रुग्णालय कोरोना सेंटर येथील रुग्णांना फळवाटप आणि ४० आशा वर्कर व उपस्थित पत्रकारांना सॅनिटायझर व मास्क वाटप


यवतचे उपसरपंच श्री. सुभाष बापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त यवत रुग्णालय  कोरोना सेंटर येथील रुग्णांना फळवाटप आणि ४० आशा वर्कर व उपस्थित पत्रकारांना सॅनिटायझर व मास्क वाटप

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी

यवत (ता. दौंड) गावचे विद्यमान उपसरपंच श्री.सुभाष बापू यादव यांच्या वाढदिवसानिमित्त   यवत ग्रामीण रुग्णालय कोरोना सेंटर येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. व यवत मधल्या ४० आशा वर्कर यांना सॅनिटायझर हॅन्ड ग्लोज मास्क वाटप करण्यात आले. व उपस्थित पत्रकारांना सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले.  अचानक दुःखद घटनेमुळे बापू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून हा कार्यक्रम पार पाडण्यास सांगितले. यावेळी दौंड पंचायत समिती सदस्य सौ. निशा निलेश शेंडगे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री सदा बापू दोरगे ,यवत चे सरपंच श्री समीर नाना दोरगे , ग्रा. सदस्य सौ.मनीषा ताई रायकर , ग्रा. सदस्य श्री. इम्रान तांबोळी  , श्री मंगेश रायकर समता परिषद कार्याध्यक्ष दौंड तालुका, सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश बाबा शेंडगे ,श्री सुरज भाऊ चोरगे,  श्री सोमनाथ रायकर, यवत मधले डॉ. रमेश जाधव, व  डॉ.चेतन ,डॉ. गरड, व आशा वर्करआणि पत्रकार बंधू उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News