भारतीय रेल्वेद्वारे आजमितीस एकूण 813 मे.टन द्रवरूप ऑक्सिजनचे वितरण


भारतीय रेल्वेद्वारे आजमितीस एकूण 813 मे.टन द्रवरूप ऑक्सिजनचे वितरण

नवी दिल्ली, 1 मे 2021

 

देशभरातील विविध राज्यांमध्ये एलएमओ अर्थात द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्याची गती वाढवत भारतीय रेल्वेने 813 मे.टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन 56 टँकर्सद्वारे देशभरातील विविध राज्यांत पाठविला आहे. 14 ऑक्सिजन एक्सप्रेसने आपला प्रवास अगोदरच पूर्ण केला असून 18 टँकर्सद्वारे आणखी 342 मे.टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन भारित 5 ऑक्सिजन एक्सप्रेस तैनात आहेत. मागणी करणाऱ्या राज्यांना कमीत कमी वेळात जास्तीत जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

हरियाणामध्ये आज पहिल्या आणि दुसऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसने 5 टँकरद्वारे 79 मे.टन एलएमओ वाहून नेला. 2  टँकरमध्ये 30.6 मेट्रिक टन एलएमओ घेऊन जाणारी तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस अंगुलपासून सुरू झाली असून सध्या हरियाणाच्या दिशेने मार्गस्थ आहे.

तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस 22.19 मेट्रिक टन एलएमओ घेऊन राउरकेलामार्गे आज रात्री जबलपूरला पोहोचेल.

3 टँकर्सद्वारे 44.88 मे.टन एलएमओ सह बोकारोहून उत्तर प्रदेशला 8 वी ऑक्सिजन एक्सप्रेस जाणार आहे.

दिल्लीला पुढील 24 तासात दुर्गापूरहून 6 टँकरद्वारे 120 मे.टन एलएमओ मिळेल.

अंगूलहून 124.26 मे.टन एलएमओ घेऊन तेलंगणाला देखील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस जात आहे.

आतापर्यंतभारतीय रेल्वेने महाराष्ट्राला (174 मेट्रिक टन)उत्तर प्रदेशला (355 मेट्रिक टन)मध्य प्रदेशला (134.77 मेट्रिक टन)दिल्लीला (70 मेट्रिक टन) आणि हरियाणाला (79 मेट्रिक टन) असा एकूण 813 मेट्रिक टन हून अधिक एलएमओ वितरित केला आहे.  तेलंगणासाठी लवकरच ऑक्सिजन एक्सप्रेसला सुरुवात होईल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News