रंधवे परिवाराकडून एक घास मदतीचा.. पाटस कोविड सेंटरला केले फळ वाटप


रंधवे परिवाराकडून एक घास मदतीचा.. पाटस कोविड सेंटरला केले फळ वाटप

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी:

पाटस : दौंड मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाषमामा रंधवे यांच्याकडून कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून आज (दि.१) रोजी पाटस कोविड सेंटर येथील रुग्णांना आण्णा महाराज रंधवे आणि दौंड तालुका समता परिषदेचे विद्यमान लोकप्रिय कार्यक्षम अध्यक्ष सचिन रंधवे यांच्या शुभहस्ते मोसंबी पेटी आणि सफरचंद पेटी भेट देण्यात आली.

      रंधवे परिवाराकडून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाज हिताचे उपक्रम राबविण्यात येतात. अडीअडचणीच्या वेळी गरजूंना मदत करणे पण त्याचा कोणताही गाजावाजा न करता, श्रेय न घेता केवळ निस्वार्थ भावनेने समाजकार्य करत राहणे हेच रंधवे परिवाराचे वैशिष्ट्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून व १मे या महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून रंधवे परिवारातर्फे पाटस कोविड सेंटरला फळे वाटप करण्यात आली.

      त्यावेळी कोविड सेंटर मधील रुग्णांना आपण घरीच असल्यासारखे वाटत होते. कारण रंधवे कुटुंबातील लोकांची ज्या पद्धतीने रुग्णांशी संवाद साधून आपुलकीने विचारपूस केली व इथून पुढे लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले ते पाहून सर्वच रुग्णांना एक आधार वाटला. यावेळी चांगला उपक्रम राबविल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. तसेच परिसरातील पुढारी लोकांनी कोविड सेंटरमध्ये असेच उपक्रम राबवावेत म्हणजे त्याठिकाणी रुग्ण मानसिक ताण आणि तणाव घेणार नाहीत व ते लवकर बरे होऊन घरी जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News