प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना लसीकरण होने गरजेचे


प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना लसीकरण होने गरजेचे

सज्जाद पठाण शेवगाव प्रतिनिधी:

शेवगाव दि. ३०  कोरोना संकट काळात तालुक्यातील प्राथमिक गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत असून सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचे असून त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र कॅम्प लावावा अशी मागणी गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व प्राथमिक शिक्षक समन्वय समिती यांनी तहसिलदार अर्चना पागिरे , गटविकास अधिकारी महेश डोके व  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांच्याकडे केली आहे.

कोविड 19 च्या प्रादुर्भाव सदयस्थीती अतिशय वेगाने वाढत असल्याने दररोज नियमितपणे रुग्ण संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात  सुमारे 708 प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. सध्या स्थानिक पातळीवर माझे कुंटुंब माझी जवाबदारी कुटुंब सर्व्हेक्षण कामी तसेच काही शिक्षकांना कोविड केअर सेंटर व चेकपोस्टवर कर्तव्य बजावण्याचे आदेश तहसिलदार अर्चना पागिरे यांनी दिले आहेत. सदर काम करतांना प्राथमिक /माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास निश्‍चीत फायदा होईल . सदर लसीकरण करणे संदर्भात सर्व शिक्षकांचे मोबाईल क्रमांक व आधारकार्ड नंबर रजिस्टेशन करणे साठी आपल्या कार्यालयात पेनड्राईव्ह मध्ये तहसिल व आरोग्य विभागास माहिती देण्यात आलेली आहे. असे गटशिक्षणाधिकारी कराड यांनी सांगीतले.

संघटना प्रतिनीधी समन्वय समितीच्या नेते रघुनाथ लबडे, प्रल्हाद गजभीव, रमेश गोरे, सुभाष घुले, बलङीम मुखेकर, रा. भि .बडे,  ए. एस शिरसाठ, तात्यासाहेब बोडखे, काशिनाथ दौंड, रामकृष्ण काटे, मच्छिंद्र भापकर,  सुखदेव डेंगळे, विलास लवांडे, गोरक्षनाथ होडशिळ,  अशोक ढाकणे, राजकुमार शहाणे आदींनी तहसिलदार अर्चना पागिरे यांना प्राथमिक शिक्षकांचे लसिकरण कॅंप लावून होणे बाबतचे निवेदन दिले.

चौकट - गेले वर्षभर कोरोना कालावधी मध्ये शेवगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी ऑनलाइन ऑफलाईन अध्यपानाचे उत्कृष्ट कामकाज केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून  तहसीलदार यांच्या आदेशानुसार शिक्षक कोविड सेन्टर, चेक पोस्ट, नियंत्रण कक्ष मध्ये कर्तव्य बजावत आहेत.  माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत शिक्षक सर्वेक्षण करत आहेत. तालुक्यातील काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरण झाल्यास शिक्षक निर्धोक पणे राष्ट्रीय कर्तव्ये मध्ये सहभागी होऊ शकतील. -रामनाथ कराड,  गटशिक्षणाधिकारी शेवगाव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News