दादा पाटील महाविद्यालयाकडून कोरोना ग्रस्तांसाठी औषधांची मदत


दादा पाटील महाविद्यालयाकडून कोरोना ग्रस्तांसाठी औषधांची मदत

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घालत संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे, अनेक नागरिक ह्या आजाराला बळी पडत आहे, अशावेळी कोरोना ग्रस्तांना कौटुंबिक, सामाजिक आधारा बरोबरच आर्थिक आधारांची ही गरज आहे हे लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील रयत शिक्षण संस्थेच्या, दादा पाटील महाविद्यालयातील सेवकांनी  पंचवीस हजार रुपयांचे  औषध गोळ्या रयत शिक्षण संस्थेच्या  जनरल बॉडीचे सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आ. मा. रोहित दादा पवार यांचे हस्ते कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंडलिक अवसरे यांचेकडे प्रदान करण्यात आले.

यावेळी आ.पवार,प्रांताधिकारी अर्चना नष्टे विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जत नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव,उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे, प्रा. अनंत सोनवणे, प्रा.डॉ. संतोष लगड, प्रा. प्रताप काळे, प्रा. प्रकाश धांडे, प्रा. सर्जेराव हळणवर,श्री. विलास मोढळे, श्री. राजेंद्र काळोखे औषध विक्रेते श्री नितीन देशमुख उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News