गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी कोरोना मदतीसाठी आवाहन करताच शिक्षकांनी जमा केले तीन लाख पस्तीस हजार रुपये


गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी कोरोना मदतीसाठी आवाहन करताच शिक्षकांनी जमा केले तीन लाख पस्तीस हजार रुपये

गटविकास अधिकारी - अमोल जाधव

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत तालुक्यासह देशात कोरोनोची स्थिती बिकट होत चालली असून अशावेळी प्रशासनास वेगवेगळ्या बाबीं करिता आर्थिक निधी अपुरा पडत आहे .या सर्व बाबींचा विचार करता मग कर्जत तालुक्याचे गट विकास अधिकारी अमोल जाधव हे मागे कसे राहतील लगेच जाधव यांनी तालुक्यातील शिक्षकांना या कामी मदतीचे आव्हान केले. आणि लगेच शिक्षकांनी या आव्हानास तात्काळ सकारात्मक दाद देत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३२५ प्राथमिक शिक्षकांनी फक्त तीन दिवसांत ३३५००० (तीन लाख पस्तीस हजार ) 


रुपयांची मदत गोळा केली. आणि ही मदत तात्काळ गट विकास अधिकारी अमोल जाधव यांचे मार्फत तालुका प्रशासन कडे आॅक्सिजन कॉंन्सेनट्रॅक्टर  व औषधे आणि  इतर गोष्टींसाठी आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुपूर्त करण्यात आले . या पूर्वीही शिक्षकांनी कोरोनो च्या पहिल्या टप्प्यात देखील अशाचप्रकारे सामाजिक भान जपत ५०० कुटुंबाना जिवनावस्यक किराणा साहित्य वाटप केले होते. परंतु कोरोनाच्या अशा कठीण प्रसंगी नाईलाजास्तव शिक्षकांना घरी थांबावे लागत आहे.परंतु त्यांच्यातील सामाजिक सेवेची भावना कुठल्या न कुठल्या माध्यमातून तेवत ठेवण्याचा हा तालुक्यातील शिक्षकांचा मानस आहे. अनेक शिक्षक चेक पोस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेनिंग , माझें कुटुंब  माझी जबाबदारी सर्वे या कामात सहभाग नोंदवत आहे. आणि हे काम करताना १० पेक्षा  अधिक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह  आले आहेत. आणि काही जण कुटुंबाच्या भीती पोटी जरी मागे राहत असले तरी लस घेताच हिरीरीने या कामात सहभाग नोंदवणार आहेत . शिक्षकांच्या या आदर्शवत कार्यामुळे कर्जत तालुका प्रशासनाच्या वतीने गट विकास अधिकारी अमोल जाधव व विस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड  यांनी  ही मदत नक्कीच प्रशासनास बळ देईल असे सांगत सर्वांचे आभार मानले तसेच एक ना एक रुपया योग्य कामी खर्च होईल याचे आश्वासन दिले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News