ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप विरुद्ध दिशेला जाऊन पलटी, दुचाकीस्वार किरकोळ जखमी


ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप विरुद्ध दिशेला जाऊन पलटी, दुचाकीस्वार किरकोळ जखमी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

अष्टविनायक मार्गावर दौंड पाटस रोडवर ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यामध्ये दुचाकीस्वार तरुण किरकोळ जखमी झाला आहे, लोणी काळभोर येथील एक तरुण आपल्या दुचाकी वर काष्टी येथील आपल्या बहिणीकडे जात असताना वायरलेस फाटा च्या पुढे आल्यानंतर समोरून एक पिकप दौंड वरून पुण्याकडे जात असताना अचानक पिकप त्या तरुणाच्या दिशेने गेला, त्या तरुणाने प्रसंगावधान राखत दुचाकीचा वेग वाढवल्यामुळे  त्याच्या उजव्या पायाला किरकोळ जखम होऊन दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले , तरुण जागेवरच पडला आणि  पीकप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली,त्या पिकप मध्ये असलेले तिन्ही व्यक्तींना सुदैवाने काहीही झाले नाही,अशी माहिती तेथील स्थानिक रहिवाशी असलेले विनोद उर्फ दादा सोनवणे यांनी दिली आहे, दादा सोनवणे यांनी चालकाला स्वतःची दुचाकी देऊन जखमी झालेल्या तरुणाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी सांगितले, नंतर त्याठिकाणी क्रेन बोलावून सदर चा पिकप खड्ड्यातून वर घेऊन उभा केला,आणि जखमी तरुणाच्या नातेवाइक गिरमकर यांना    बोलावून घेतले,त्यांनी सामंजस्याने घेत कसलीही वादावादी न करता मिटवून घेतले, गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले आणि दादा सोनवणे यांनी दोघांनाही आपापल्या मार्गाने पाठवून दिले,त्यावेळी त्या पिकप चालकाने त्यांचे आभार मानले, तेथील रहिवासी असलेले दादा सोनवणे नेहमीच अशा घटना घडल्यानंतर तत्परतेने लोकांच्या मदतीला धावत असतात त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News