आरपीआयच्या वतीने गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्याचे वाटप..टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या दोनशे कुटुंबीयांना आधार


आरपीआयच्या वतीने गरजू कुटुंबीयांना अन्न-धान्याचे वाटप..टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या दोनशे कुटुंबीयांना आधार

अहमदनगर(प्रतिनिधी सजय) सावंत - टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आलेल्या शहरातील दोनशे गरजू कुटुंबीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले.

टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू घटकांसाठी आरपीआयने पुढाकार घेऊन प्रत्येकी एका कुटुंबासाठी 5 किलो गहू व 5 किलो तांदुळ देत आहे. नुकतेच सावेडी येथे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अन्न-धान्य पाकिट बनवून कार्यकर्त्यांकडे वितरीत केले आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या भागातील गरजू घटकांना ही मदत पोहोच करणार आहे.  शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, पहिला टाळेबंदीत सर्वसामान्य गरजू घटकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती.कोरोनामुळे पुन्हा पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत रोजगार नसल्याने सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमारी होत आहे. या संकट काळात कोणीही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी आरपीआयच्या वतीने अन्न-धान्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात राहणारे हातावर पोट असणारे व धुणी, भांडी करणार्‍या महिलांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जात आहे. आरपीआयचे संकेत कळकुंबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, तुषार गायकवाड, उमेश गायकवाड, आकाश भालेराव, हर्षद पेंढारकर, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मोनू गायकवाड, चिकू गायकवाड परिश्रम घेत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News